याबाबत राखी जाधव यांनी आपल्या एक्स हँडलवरून भूमिका स्पष्ट केली आहे. त्या म्हणाल्या की, सिद्धिविनायक मंदिराचा विकास केला जात आहे. ही अत्यंत आनंदाची बाब आहे. श्री सिद्धिविनायक मंदिर संपूर्ण मुंबईचे प्रार्थना स्थान आहे. श्रींचे दर्शन घेण्यासाठी जगभरातून लोक येतात. त्यामुळे श्रींच्या मंदिराचा कायापालट झालाच पाहिजे पण विकासकामाच्या आड कोणी मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीवर डल्ला तर मारत नाही ना? अशी शंका त्यांनी उपस्थित केली.
पुढे त्या म्हणाल्या की, श्रींच्या मंदिराच्या विकासासाठी मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीतून ५०० कोटींची तरतूद करण्यात येणार आहे. श्री सिद्धिविनायक मंदिर हे एक न्यास आहे आणि त्याचे दैनंदिन उत्पन्न ३० लाख आहे. त्यामुळे विकासाचा खर्च त्यांच्याकडून केला जाऊ शकतो. अगदी त्यात कमतरता भासली तर राज्य सरकारला अधिकचा निधी सरकारला देता येईल मात्र या दोन पर्यांयाचा विचार न करता सरळसरळ हा आर्थिक भार मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीवर टाकण्यात येणार आहे. CSR फंडचा तिसरा पर्याय देखील होता, मात्र त्याकडेही कानाडोळा केला जात आहे. मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र शासनाकडे इतके पर्याय असताना मुंबई महानगरपालिकेवरच हा आर्थिक भार का टाकला जात आहे? कुणाच्या 'कल्याणा' साठी हा निर्णय घेतला जात आहे ? असा सवाल त्यांनी केला आहे.
मुंबई महानगरपालिकेवर प्रशासक कारभार नेमून आता बराच कालावधी लोटला आहे,. या कार्यकाळात अनेकदा राज्य सरकारने आडमार्गाने महापालिकेवर डल्ला मारला आहे. आता तर चक्क देवाच्या नावावर चोरी केली जाणार का ? असा प्रश्न आम्हाला पडत आहे असं त्या म्हणाल्या.
No comments:
Post a Comment