Mumbai News - मुंबईत २४ एप्रिलपर्यंत ५ टक्के पाणीकपात - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

14 March 2024

Mumbai News - मुंबईत २४ एप्रिलपर्यंत ५ टक्के पाणीकपात


मुंबई - बृहन्‍मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून भांडूप जलशुद्धीकरण केंद्राचे परिरक्षण काम सुरु आहे. या कामांमुळे २४ एप्रिल २०२४ पर्यंत मुंबईच्या पाणीपुरवठ्यात ५ टक्के पाणी कपात केली जाणार असल्याची माहिती मुंबई महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे. (Water cut in Mumbai) (Mumbai Latest News)

भांडूप संकुलातील जलशुद्धीकरण केंद्रातून बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्‍या प्रमुख भागांना पाणीपुरवठा केला जातो. आशिया खंडातील हे सर्वात मोठे जलशुद्धीकरण केंद्र आहे. भांडूप संकुल येथे १ हजार ९१० दशलक्ष लीटर आणि ९०० दशलक्ष लीटर पाणी शुद्धीकरण करणारी दोन युनिट्स आहेत. त्‍या पैकी ९०० दशलक्ष लीटर क्षमतेच्या जलशुद्धीकरण केंद्राद्वारे प्रतिदिन ९९० दशलक्ष लीटर पाण्यावर प्रक्रिया केली जाते.

९०० दशलक्ष लीटर क्षमतेच्‍या या जलशुद्धीकरण केंद्रातील मोठ्या जलशुद्धीकरण प्रक्रिया टाक्या स्वच्छ करण्याची पावसाळ्यापूर्वीची परिरक्षण कार्यवाही सध्‍या हाती घेण्‍यात आली आहे. यामुळे २४ एप्रिल २०२४ पर्यंत बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून संपूर्ण मुंबईत होणा-या एकूण पाणीपुरवठ्यात ५ टक्के पाणी कपात करण्‍यात येणार आहे. याची नोंद घेऊन मुंबईकरांनी पाण्याचा जपून व काटकसरीने वापर करावा. या कामादरम्यान महापालिका प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad