Lok Sabha Election - इंडिया आघाडीची सभा म्हणजे तडीपार नेत्यांची सभा - मुख्यमंत्री - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

18 March 2024

Lok Sabha Election - इंडिया आघाडीची सभा म्हणजे तडीपार नेत्यांची सभा - मुख्यमंत्री


मुंबई - काल छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे झालेली इंडिया आघाडीची सभा म्हणजे ज्यांना देशाच्या जनतेने आधीच नाकारले आहे. सत्तेतून हद्दपार केलेले आहे अशा इंडिया आघाडीच्या तडीपार नेत्यांची सभा होती, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उबाठा गट आणि त्यांच्या इंडिया आघाडीच्या मित्र पक्षांवर घणाणाती टीका केली.

मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत विरोधकांवर निशाणा साधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, कालची इंडिया आघाडीची सभा म्हणजे केवळ एक फॅमिली गँदरिंग होती. भानुमतीचा गुंदा अशी एक गोष्ट आहे. तशा प्रकारे धरून-बांधून आणलेले लोक या सभेमध्ये दिसत होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होते, नैराश्याचे भाव स्पष्ट दिसत होते. एक विश्वास गमावलेला विरोधी पक्ष समोर दिसत होता. त्यांच्यात कोणताही समन्वय नाही. कोणताही विकासाचा अजेंडा नाही, पंतप्रधानपदाचा उमेदवार देखील ते अजूनपर्यंत जाहीर करू शकले नाहीत. केवळ एकमेकांकडे बोट दाखवतात. फक्त माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणे, त्यांचा द्वेष करणे हा एकमेव अजेंडा असल्याचे प्रत्येकाच्या भाषणातून दिसत होता. २०१४ पूर्वी याच इंडिया आघाडीच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना चौकीदार म्हणून हिणवले होते. आज देशाच्या जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.

बाळासाहेबांची माफी मागायला हवी - 
या सभेमधून छत्रपती शिवाजी महाराज पार्क मध्ये एक नवीन गोष्ट घडली, ती म्हणजे वंदनीय बाळासाहेब भाषणाची सुरुवात करताना ज्या प्रकारे 'माझ्या तमाम हिंदू बंधू, भगिनींनो आणि मातांनो' या शब्दांनी भाषणाची सुरुवात करायचे. ते शब्द देखील उद्धव ठाकरे यांनी भाषण करताना गळाले. यावरून त्यांनी वंदनीय बाळासाहेबांच्या विचारांना आणि धोरणांना कायमची तिलांजली दिल्याचे दिसून आले. त्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले म्हणून आम्हाला त्यांना सोडण्याचा विचार करावा लागला. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधी आणि हिंदू धर्माचा अपमान करणाऱ्या स्टालिन सारख्या लोकांसोबत एकाच मंचावर बसावे लागले, ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. त्यासाठी उद्धव ठाकरे यांनी वंदनीय बाळासाहेबांची माफी मागायला हवी ”, असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

सत्तेसाठी आपली भूमिका बदलली -   
“जम्मू-काश्मीरमध्ये महाराष्ट्र भवन होऊ देणार नाही, असं फारुक अब्दुल्ला म्हणाले. उद्धव ठाकरे त्यांच्या बाजूला बसले. कालच्या सभेमध्ये बोलायला उद्धव ठाकरे यांना फक्त पाच मिनिटे देण्यात आली हे अत्यंत दुःखद आहे. पण आम्ही छातीठोकपणे बोलत गेलो. त्यांनी सत्तेसाठी आपली भूमिका बदलली, पण आम्ही सत्तेसाठी भूमिका बदलणारे नाहीत. शिवसेनेला एकेकाळी शत्रू मांडणारे काँग्रेस ठाकरेंसोबत आहे. हे पॉलिटिकल क्रॉम्प्रमाईज होतं”, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

हो आम्ही खरंच डिलर आहोत - 
“आपल्या भाषणामध्ये विरोधक आम्हाला डीलर म्हणाले. मी म्हणतो हो आम्ही खरंच डिलर आहोत. कारण शेतकऱ्यांच्या हितासाठी, ज्येष्ठ, तरुणांना न्याय देण्यासाठी आम्ही डील केले. काँग्रेस सरकारच्या काळात किती घोटाळे आले. आता मोदींच्या काळात एकही घोटाळा आला नाही. पहिल्या कॅबिनेटपासून ते शेवटच्या कॅबिनेटपर्यंत 500 निर्णय घेतले. एक पॉझिटीव्ही आणण्याचं काम आम्ही केलं आहे. महाराष्ट्र स्वच्छतेत एक नंबर आला. मंत्रिमंडळातील सर्व सहकाऱ्यांनी यासाठी योगदान दिले आहे. मी मुख्यमंत्री म्हणून फार समाधानी आहे. लोकांमध्ये सकारात्मक दृष्टीकोन तयार झाला आहे. त्याचा फायदा लोकसभा निवडणुकीत नक्की होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनेक विकासकामांचं उद्घाटन केलं. केंद्राने आम्हाला पूर्ण पाठबळ दिलं आहे. महाराष्ट्राच्या जनतेने देखील आम्हाला भरभरून पाठिंबा दिला प्रोत्साहन दिले. त्यासाठी मी महाराष्ट्राच्या जनतेचा देखील ऋणी आहे, असंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.  

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad