डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रवेश द्वारावरून आंदोलक, पोलिसांमध्ये तुफान राडा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

11 March 2024

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रवेश द्वारावरून आंदोलक, पोलिसांमध्ये तुफान राडा


अमरावती - अमरावतीच्या पांढरी खानापूर गावाच्या प्रवेशद्वाराला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यात यावं, यासाठी चार दिवसांपासून विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे. गावातील संचारबंदी झुगारून आंदोलक अमरावतीत दाखल झाले. अमरावतीच्या खानापूर पांढरीमध्ये आंदोलक आणि पोलिसांमध्ये तुफान राडा झाला आहे. प्रवेश द्वाराच्या मुद्द्यावरून जमाव आक्रमक झाला आणि त्यांनी पोलिसांवर दगडफेक केली. तर पोलिसांनी जमावावर लाठीचार्ज केला आहे.

अमरावतीच्या अंजनगाव सुरजी तालुक्यातील पांढरी खानमपूर गावात महापुरुषांच्या नावाची कमान उभारण्यावरुन गावातील दोन गटांमध्ये वाद सुरु होता. गावात ही कमान उभारायची की नाही, यावरुन एकमत होते नव्हते. मात्र, हा निर्णय होण्यापूर्वीच एका गटाने परस्पर कमान उभारली. त्यानंतर या कमानीला नाव काय द्यायचे यावरुन दोन्ही गटांतील वाद विकोपाला गेला होता. गेल्या अनेक दिवसांपासून हा वाद प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या दरबारात होता. परंतु, चार-पाच दिवसांपूर्वी या गावातील एका गट अमरावतीच्या दिशेने निघाले होते. त्यानंतर हे सर्वजण अमरावतीहून मंत्रालयाच्या दिशेने जाणार होते. त्यावेळी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्यांची समजूत काढत या मुद्द्यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते. या गावकऱ्यांशी दर्यापूर येथे चर्चा सुरु होती.

गेल्या तीन दिवसांमध्ये कोणताही तोडगा न निघाल्याने एका गटाचा रोष उफाळून आला आहे. आज बैठक सुरु होती, तेव्हा बाहेर आंदोलक आक्रमक झाले होते. गावातील शिष्टमंडळ आणि पोलीस अधीक्षकांची बैठक सुरु होती. ही बैठक लांबल्याने आंदोलक आक्रमक झाले. तीन दिवस उलटूनही तोडगा न निघाल्यामुळे पांढरी खानमपूर गावातील एका गटाचा संयम सुटला आणि त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचे गेट तोडून आतमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी लाठीमार करुन त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु, आक्रमक असलेले आंदोलक आणखीनच बिथरले आणि त्यांनी तुफान दगडफेक करण्यास सुरुवात केली. या आंदोलकांना नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. तसेच आंदोलकांवर पाण्याच्या फवाऱ्याने मारा केला. मात्र, आंदोलक अजूनही आक्रमक मनस्थितीत आहेत. आंदोलकांची मागणी मान्य केल्यास गावातील दुसऱ्या गटाचे वेगळे मत आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासन कोंडीत सापडले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad