Loksabha Election - बसपाकडून १६ उमेदवारांची नावे जाहीर - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

Loksabha Election - बसपाकडून १६ उमेदवारांची नावे जाहीर

Share This


लखनौ - बहुजन समाजवादी पक्षाने आज (दि. २४) उत्तर प्रदेशातील लोकसभा निवडणुकीसाठी १६ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. बसपाने सात मुस्लिम उमेदवारांना तिकिट दिले आहे. यामध्ये सहारनपूर जागेवर सपा-काँग्रेस आघाडीचे इम्रान मसूद यांच्या विरोधात माजिद अली यांना उभे केले आहे. कैराना लोकसभा मतदारसंघातून श्रीपाल स्ंिह यांचा सामना इक्रा हसनशी होणार आहे.

मुझफ्फरनगरमधून दारा सिंह प्रजापती, बिजनौरमधून विजेंद्र सिंह रिंगणात आहेत. सुरेंद्र पाल सिंग यांना नगीना(एससी)येथून बसपाकडून तिकिट मिळाले आहे. मोहम्मद इरफान सैफी यांना मुरादाबादमधून उमेदवारी देण्यात आली आहे. जीशान खान रामपूरमधून निवडणूक लढवणार आहेत.

शौलत अली यांना संभल लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. बसपाने अमरोहा लोकसभा मतदारसंघातून मुजाहिद हुसैन यांना उमेदवारी दिली आहे. त्यांचा सामना भाजपचे कंवर सिंग तवर आणि सपा-काँग्रेस आघाडीचे दानिश अली यांच्याशी होणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages