Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

मेट्रोच्या कंत्राटदारांना मालमत्ता करवसुलीसाठी नोटिसा


मुंबई - मुंबई शहर व उपनगरात मेट्रोची कामे सुरू आहेत. कास्टिंग यार्ड भूखंडाचा मालमत्ता कर भरण्यासाठी मेट्रोच्या कंत्राटदारांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. १९ मार्चपासून नोटीस बजावण्यात आली असून वेळीत मालमत्ता कर भरावा, यासाठी मुंबई महापालिकेच्या कर निर्धारण व संकलन विभागाकडून पाठपुरावा सुरू आहे. दरम्यान, बड्या थकबाकीदारांना १९ मार्चपासून नोटीस बजावण्यात आली असून थकित मालमत्ता कर वेळीच भरावा, असे आवाहन बड्या थकबाकीदारांना केल्याचे मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी सांगितले.

पालिकेच्या कर निर्धारण व संकलन विभागाच्या वतीने वर्ष २०२३-२४ या आर्थिक वर्षांत साडेचार हजार कोटींचे मालमत्ता करवसुलीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कर निर्धारण व संकलन विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी परिश्रम घेत आहेत. २८ मार्चला दुपारी ३ वाजेपर्यंत २ हजार ३९८ कोटींची करवसुली झाली आहे. सध्या कर निर्धारण व संकलन विभागाने मुंबई शहर आणि उपनगरांमधील मोठ्या थकबाकीदारांवर लक्ष केंद्रित केले आहे. तसेच मागील थकबाकी वसुलीसाठी प्राधान्य देण्यात येत आहे.

मुंबईत विविध ठिकाणी मेट्रोची कामे सुरू आहेत. कास्टिंग यार्ड भूखंडाचा मालमत्ता कर भरण्याच्या करारनाम्यानुसार जबाबदारी संबंधित कंत्राटदारांवर आहे. कंत्राटदारांकडून विलंब होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे मेसर्स एचसीसी-एमएमसी, मेसर्स सीईसी-आयटीडी, मेसर्स डोगा सोमा आणि मेसर्स एल अँड टी स्टेक या कंत्राटदारांना मालमत्ता कर भरण्याची नोटीस बजावण्यात आली आहे.

मेट्रोचे बडे थकबाकीदार

मे. एचसीसी-एमएमसी : ९८ कोटी ९२ लाख ४१ हजार

मे. सीईसी-आयटीडी : ९५ कोटी ६० लाख ७ हजार

मे. डोगा-सोमा : ९४ कोटी ३९ लाख ८१ हजार

मे. एलअँडटी- स्टेक : ८२ कोटी १२ लाख ८४ हजार

मुलुंड/टी : निर्मल लाइफस्टाईल - ४० कोटी ६५ लाख ८३ हजार ७८५ रुपये

मालाड/पी उत्तर : विधी रिॲलिएटर्स - १६ कोटी ९५ लाख ८ हजार ९१९ रुपये

मालाड/पी उत्तर जे. कुमार इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. - १६ कोटी ३० लाख २५ हजार ४३२ रुपये

मालाड/पी उत्तर : रॉयल रिॲलिएटर्स - ४ कोटी ४४ लाख ४८ हजार १२० रुपये

माटुंगा/एफ उत्तर : मे. एचसीसी-एमएमसी - ४ कोटी ७ लाख ६३ हजार ४१९ रुपये

मालाड/पी उत्तर : राधा कन्स्ट्रक्शन - २ कोटी ९० लाख ७४ हजार ३८७ रुपये

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom