चौथ्या टप्प्यात राज्यात 298 उमेदवार निवडणूक रिंगणात - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

चौथ्या टप्प्यात राज्यात 298 उमेदवार निवडणूक रिंगणात

Share This


मुंबई - लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात राज्यातील 11 मतदारसंघात नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यात 369 उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले होते. त्यातील 71 उमेदवारांनी माघार घेतल्याने आता 298 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे. (Lok Sabha Election 2024)

चौथ्या टप्प्यातील अंतिम निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची संख्या : नंदुरबार 11, जळगाव 14, रावेर 24, जालना 26, औरंगाबाद 37, मावळ 33, पुणे 35, शिरुर 32, अहमदनगर 25, शिर्डी 20, बीड 41 अशी आहे. या 11 मतदारसंघांमध्ये 13 मे रोजी मतदान होणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages