Mumbai News - भाडे नाकारणाऱ्या ३२ हजार रिक्षाचालकांवर कारवाई - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

26 April 2024

Mumbai News - भाडे नाकारणाऱ्या ३२ हजार रिक्षाचालकांवर कारवाई


मुंबई - मुंबईमध्ये रिक्षा आणि टॅक्सी चालकांकडून नेहमीच भाडे नाकारले जाते. याविरोधात मुंबईकरांच्या अनेक तक्रारी होत्या. या तक्रारींची दखल घेत मुंबई वाहतूक पोलिसांनी १५ दिवसांची विशेष मोहिम राबविली. या मोहिमेत भाडे नाकारणाऱ्या ३२ हजार ६५८ रिक्षाचालकांवर (action against rickshaw drivers) कारवाई करण्यात आली आहे. याचबरोबर अन्य नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणात रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. (Mumbai Latest News)

मुंबईतील रेल्वे स्थानके, मॉल, बस स्थानके तसेच इतर ठिकाणी लांब पल्ल्याचे भाडे मिळविण्यासाठी रिक्षाचालक नजीकचे भाडे नाकारतात. अशा अनेक तक्रारी मुंबई पोलिसांकडे वेगवेगळ्या माध्यमातून येत होत्या. त्याचबरोबर चालक गणवेश परिधान करीत नाहीत, बॅच तसेच इतर कागदपत्रे बाळगत नाहीत, नियमांचे उल्लंघन करतात अशाही तक्रारी येत होत्या. या तक्रारींची गंभीर दखल घेत बेशिस्तचालकांना धडा शिकविण्यासाठी वाहतूक पोलिसांनी ८ एप्रिल ते २२ एप्रिल या १५ दिवसांच्या कालावधीत विशेष मोहीम हाती घेतली.

३२,६५८ वाहनांचे परवाने निलंबित -
तक्रारी येत असलेल्या ठिकाणी १५ दिवसांत वाहतूक पोलिस तैनात करण्यात आले. रिक्षाचालक भाडे नाकारताना दिसल्यास त्याच ठिकाणी चालकावर कारवाई करण्यात येत होती. १५ दिवसांत ३२,६५८ रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात आली. विनागणवेश ५२६८, जादा प्रवासी वाहतूक करणे ८६५० व इतर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ५६१३ अशा एकूण ५२१८९ इ -चलान कारवाई करण्यात आली. भाडे नाकारणाऱ्या नाकारणाऱ्या ३२,६५८ वाहनांचे परवाने निलंबित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad