मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघात दोन उमेदवारी अर्ज दाखल - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

26 April 2024

मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघात दोन उमेदवारी अर्ज दाखल


मुंबई - लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील २८ - मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघात (Mumbai North East Lok Sabha Constituency) आजपासून अर्ज स्वीकृती प्रक्रियेस सुरवात झाली. पहिल्या दिवशी दोन उमेदवारांनी अर्ज दाखल केला असल्याची माहिती मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दादाराव दातकर यांनी दिली आहे. (Election 2024)(Mumbai Latest News)

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात मुंबई उपनगर जिल्ह्यात २० मे रोजी मतदान होणार आहे. मुंबई उत्तर पूर्व या लोकसभा मतदारसंघाअंतर्गत  55 - मुलुंड, 156 - विक्रोळी, 157 - भांडुप पश्चिम, 169 - घाटकोपर पश्चिम, 170 - घाटकोपर पूर्व, 171 - मानखुर्द शिवाजीनगर हे विधानसभा मतदारसंघ येतात. या निवडणुकीसाठी 3 मे 2024 ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. 4 मे रोजी दाखल अर्जाची छाननी करण्यात येईल, तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख 6 मे आहे. दिनांक 20 मे रोजी मतदान सकाळी 7  ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत होणार आहे. 4 जून रोजी मतमोजणीची प्रक्रिया उदयांचल शाळा, गोदरेज संकुल, विक्रोळी येथे करण्यात येणार आहे. 

आज उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांची नावे -
1 ) मिहीर चंद्रकांत कोटेचा (भारतीय जनता पार्टी, एकूण तीन अर्ज), 
(2) सुक्ष्मा मोतीलाल मौर्य (अपक्ष, एक अर्ज)

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad