Mumbai News - मध्य रेल्वेची लोकल सेवा विस्कळीत - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

Mumbai News - मध्य रेल्वेची लोकल सेवा विस्कळीत

Share This


मुंबई - रोज मरे त्याला कोण रडे असे मध्य रेल्वेबाबत (Mumbai Local Train) नेहमीच बोलले जाते. असाच अनुभव नेहमीच मध्य रेल्वेबाबत प्रवाशांना येतो. या आठवड्याभरात दुसऱ्यांदा मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. कल्याण - ठाकुर्लीदरम्यान पेंटाग्राफ तुटल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. (Mumbai latest news)

29 मार्च रोजी कल्याण आणि ठाकुर्ली दरम्यान पेंटाग्राफ अडकल्याने लोकल ट्रेनचा खोळंबा झाला होता. रेल्वे सेवा काही काळ बंद झाल्याने त्याचा फटका प्रवाशांना बसला होता. त्यानंतर आज ४ एप्रिल रोजी पेंटाग्राफ तुटल्याने पुन्हा एकदा लोकल ट्रेनची सेवा विस्कळीत झाली आहे. डोंंबिवली ते कल्याण दरम्यान अनेक लोकलगाड्या थांबल्या आहेत. लोकल ट्रेन थांबल्याने त्याचा फटका प्रवाशांना बसला आहे. विशेष म्हणजे एकाच ठिकाणी दुसऱ्यांदा हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages