Population - भारत जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

18 April 2024

Population - भारत जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देशमुंबई - सध्या भारत हा जगातील सर्वात जास्त लोकसंख्या (India Population) असलेला देश आहे. ताज्या आकडेवारीनुसार भारताने चीनला मागे टाकलं असल्याची आकडेवारी समोर आली आहे. संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधीचा अहवाल (युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड) (United Nations Population Fund) समोर आला आहे. यूएनएफपीए म्हणजेच संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधीच्या अहवालानुसार भारताची लोकसंख्या १४४ कोटींवर पोहोचली आहे. भारताची लोकसंख्या ७७ वर्षांमध्ये दुप्पट होण्याची शक्यता या अहवालातून वर्तवण्यात आली आहे.

युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंडच्या अहवालानुसार २०११ मध्ये झालेल्या जनगणनेत भारताची लोकसंख्या १२१ कोटी होती. त्यात वाढ होऊन भारताची लोकसंख्या १४४ कोटींवर पोहोचली आहे. भारतातील अंदाजे २४ टक्के लोकसंख्या ० ते १४ या वयोगटातील आहे, तर १७ टक्के लोकसंख्या १० ते १९ या वयोगटातील आहे. एवढेच नाही तर १० ते २४ वयोगटात २६ टक्के, (India Population 144 Crores) तर १५ ते ६४ वयोगटातील संख्या ६८ टक्के आहेत. याव्यतिरिक्त, भारतातील ७ टक्के लोकसंख्या ६५ वर्षे आणि त्याहून अधिक वयाची आहे. पुरुषांचे सरासरी आयुर्मान ७१ वर्षे आणि महिलांचे ७४ वर्षे आहे. अहवालानुसार सन २००६ ते २०२३ भारतातील लोकसंख्येपैकी २३ टक्के लोकांचे बालविवाह झाले आहेत. त्याचसोबत भारतात माता मृत्यूच्या संख्येमध्ये लक्षणीय घट झालेली (Population of India) आहे. ६४० जिल्ह्यांमध्ये केलेल्या अलीकडील संशोधनामध्ये समोर आलं आहे की, सुमारे एक तृतीयांश जिल्ह्यांमध्ये माता मृत्यू दर कमी करण्यासाठी प्रयत्न केले गेलेत. काही जिल्ह्यांमध्ये माता मृत्यूचं प्रमाण एक (India Population Update) लाखामागे ११४ ते २१० आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad