भाजपाच्या प्रदेश कार्यालयाला आग - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

JPN NEWS

२१ एप्रिल २०२४

भाजपाच्या प्रदेश कार्यालयाला आग


मुंबई - मुंबईतील नरीमन पॉइंट येथे असणार्‍या भाजपाच्या मुख्य प्रदेश कार्यालयाला भीषण आग लागली आहे. ही आग काही क्षणातच भडकल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे भाजपच्या कार्यालयाबाहेरील परिसरात एकच धूर आणि आगीचे लोट पसरले. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि आगीवर नियंत्रण मिळवले.

मिळालेल्या माहितीनुसार, आज रविवारी (२१ एप्रिल) साधारण 4.30 च्या सुमारास भाजपच्या नरिमन पॉईंट येथील कार्यालयाला आग लागली. भाजप कार्यालयात नुतनीकरणाचे काम सध्या सुरू आहे. या कामादरम्यान, किचनमध्ये वेल्डिंगचे काम सुरू असताना अचानक शॉर्ट सर्किट झाले. त्यामुळे आग लागली. या आगीत ऑफिसमध्ये असणारे कागदपत्रे आणि लाकडी फर्निचरने पेट घेतला. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाने काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवले. रविवार असल्याने कार्यालयात कोणीही नसल्याने सुदैवाने अडकलेले नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

JPN NEWS