जिंकण्याचं उद्दिष्ट समोर ठेवल्यानंतर लढावंच लागतं - उद्धव ठाकरे


मुंबई - ''जिंकण्याचं एक मोठं उद्दिष्ट ठेवल्यानंतर कशासाठी आणि कोणासाठी लढतोय हे समोर ठेवून लढावं लागतं आणि जिंकावं लागतं. आता कोणाच्याही मनात प्रश्न नाही, प्रत्येकजण जोमाने कामाला लागलेले आहेत'', ''युती किंवा आघाडी म्हटल्यावर शक्य असेल तोपर्यंत आम्ही चर्चा करत असतो. तो प्रत्येकाचा अधिकार आहे. एक क्षण असा येतो जेव्हा एकमेकांना समजून, जागावाटप जाहीर करत प्रत्यक्ष निवडणूक जिंकण्याची तयारी करावी लागते. तो क्षण आज आलाय, सर्वांच्या मनातल्या शंकांना उत्तर मिळाली असतील'', असं उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत म्हटले आहे.

आज मुंबईत महाविकास आघाडीची पत्रकार परिषद पार पडली. त्यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते. या पत्रकार परिषदेला महाविकास आघाडीतील सर्व प्रमुख नेते उपस्थित होते. यामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आदी नेते उपस्थित होते. लोकसभा निवडणूक २०२४ साठी अखेर महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला असून शिवसेना २१, राष्ट्रवादी काँग्रेस १० आणि काँग्रेस १७ जागांवर यंदाची निवडणूक लढणार आहे.

कुणाला कोणत्या जिल्ह्यात जागा?
शिवसेना - २१ जागा
जळगाव, परभणी , नाशिक, पालघर, कल्याण, ठाणे, रायगड, मावळ, धाराशिव, रत्नागिरी, बुलढाणा, हातकणंगले, संभाजीनगर, शिर्डी, सांगली, हिंगोली, यवतमाळ-वाशिम, उत्तर-पश्चिम मुंबई, मुंबई दक्षिण-मध्य, मुंबई दक्षिण, मुंबई इशान्य,

काँग्रेस - १७ जागा
नंदुरबार, धुळे, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा-गोंदिया, गड-चिमूर, चंद्रपूर, नांदेड, जालना, मुबंई उत्तर-मध्य, पुणे, लातूर, सोलापूर, कोल्हापूर, रामटेक, नॉर्थ मुंबई

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार - १० जागा
बारामती, शिरुर, सातारा, भिवंडी, हिंगोली, माढा, रावेर, वर्धा, अहमदनगर दक्षिण, बीड

Post a Comment

0 Comments