तर मुंबईतल्या 'या' जागा बिनविरोध करा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

28 April 2024

तर मुंबईतल्या 'या' जागा बिनविरोध करा

 

मुंबई - मुंबईतल्या दक्षिण मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई व उत्तर मध्य मुंबई या तीन जागा बिनविरोध करा, अशी मागणी शरद पवार गटाचे प्रवक्ते अँड निलेश भोसले यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहले आहे. मुंबईमध्ये निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यानंतरही महायुतीमधील भाजपाला मराठी उमेदवार मिळत नसल्याने शरद पवार गटाकडून असे आवाहन करण्यात आले आहे. (Lok Sabha Election 2024) (Mumbai Latest News)

''मुंबई मध्ये लोकसभा निवडणुकीची अधिसूचना जाहीर होऊन देखील तुमच्या पक्षाला मराठी उमेदवार मिळत नसल्याचे कळते. अशा परस्थिमध्ये कोणी तरी कोणताही उमेदवार देण्या पेक्षा, सुरत लोकसभा प्रमाणे मुंबई मधील तीन जागांवर बिनविरोध उमेदवार निवडून द्यावेत असे आवाहन करण्यात आले आहे.

जागावाटपाचा तिढा कायम - 
महाराष्ट्रात पाच टप्प्यात लोकसभा निवडणूका होत आहेत. राज्यात शेवटच्या टप्प्यात म्हणजेच २० मे रोजी मुंबईच्या सहा लोकसभा मतदार संघासाठी मतदान होत आहे. केंद्रात आणि राज्यात भाजपा, शिवसेना तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीचे सरकार सत्तेत आहे. त्यानंतरही तीनही पक्षात पक्षात जागावाटप झालेले नाही. जागावाटप करण्यासाठी अद्यापही बैठका सुरु आहेत.


भाजपचे दोन गुजराती उमेदवार - 
मुंबईमध्ये भाजपने मिहीर कोटेचा व पियुष गोयेल हे दोन गुजराती उमेदवार दिले आहेत. दोन उमेदवार गुजराती दिल्याने टीका झाल्यावर भाजपकडून उज्ज्वल निकम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. इतर जागांवर अद्यापही उमेदवार घोषित करण्यात आलेले नाहीत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad