मुंबई - सध्या मोठ्या प्रमाणात फास्टफुडला मागणी आहे. फास्टफुडची दुकाने मुंबईत मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. मात्र हेच फास्टफुड मुंबईकरांच्या आरोग्यासाठी हानिकारक असल्याचे समोर आले आहे. गोरेगाव पूर्व येथील स्याटेलाईट टॉवर येथे चिकन शोर्मा खाल्याने 12 जणांना विषबाधा (Food Poisioning because of eating Chicken Shawarma) झाली आहे. (Marathi Latest News)
गोरेगाव पूर्व संतोष नगर येथील स्याटेलाईट टॉवर फेज 3 येथे 26 एप्रिल रोजी रात्री 11 च्या सुमारास चिकन शोर्मा खाल्याने 10 जणांना विषबाधा झाली. या सर्वांना एम डब्ल्यू देसाई रुग्णालयात दाखल करण्यात आले. 27 एप्रिल रोजी आणखी 2 जणांना एम डब्ल्यू देसाई रुग्णालयात दाखल करण्यात आले. चिकन शोर्मा खाल्याने दोन दिवसात 12 जणांना विषबाधा झाली. या सर्वांवर उपचार केल्यावर 9 जणांची प्रकृती स्थिर असल्याने आज 28 एप्रिल रोजी डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 3 जण अद्याप रुग्णालयात उपचार घेत आहेत. स्वप्नील डहाणूकर, मुश्ताक अहमद, सुजित जैस्वाल अशी उपचार घेत असलेल्या रुग्णांची नावे आहेत.
No comments:
Post a Comment