उन्हाळ्यात ही 5 फळे नक्की खा ! - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

07 May 2024

उन्हाळ्यात ही 5 फळे नक्की खा !


मुंबई - सध्या उन्हाळा सुरू झाला आहे. सर्वत्र उन्हाचा तडाखा पाहायला मिळत आहे. तापमान चाळिशीपार गेले आहे. त्यामुळे आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. अशावेळी तुम्ही उन्हाळ्याच्या या मोसमात 5 फळे खाल्ली तर तुम्ही एकदम आरोग्यदायी आणि स्वस्थ राहाल. तसेच तुमची तब्येतही खराब होणार नाही. (Eat these 5 fruits in summer

उन्हाळ्यामुळे सर्वांना त्रास होत आहे. अशावेळी तुम्ही पाण्याची कमतरता पूर्ण करण्यासाठी टरबूज खाऊ शकतात. टरबूजमध्ये फायबर, लोह आणि व्हिटामिन-ए, सी आणि बी असते. त्यासोबतच यामध्ये लाइकोपीन नावाचे तत्त्व असते. हे तत्त्व अँटीऑक्सिडेंट सारखे काम करते. यामुळेच फळ हे गडद लाल रंगाचे बनते. हे ऑक्सिडेंट स्ट्रोकच्या धोक्याला कमी करते. सोबतच रक्तदाबाची पातळीही कमी करू शकतो.

तायवानी टरबूजमध्ये विशेष पोषक तत्त्व आढळतात. हे चवीला खूप स्वादिष्ट असते. याच्या सेवनाने रोगप्रतिकार क्षमता वाढते. तसेच पचनात सुधारणा होते. रक्तदाबाची पातळी कमी होते. तसेच त्वचेचे आरोग्यही चांगले राहते.

खरबूज एक प्रकारे टरबूजाचीच जात आहे. खरबूज खाण्याचा विशेष फायदा मासिक पाळीदरम्यान महिलांना होतो. महिलांसाठी हे फळ फायदेशीर आहे. केसांसाठीही फायदेशीर तसेच वजन घटवण्यात, डोळ्यांसाठी, पाचन व्यवस्थेसाठी खूप फायदेशीर आहे.

बेलाच्या फळामुळे शरीराचे तापमान थंड ठेवण्यास मदत होते. यामध्ये अनेक पोषक घटक आढळतात. हे मेंदूला सक्रिय ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे कामाचा ताण आणि उष्णतेचा थकवा शरीरावर जास्त पडत नाही. तसेच मूड चांगला राहतो. बेलाच्या फळाचा रस प्यायल्याने काही शरीराला फायदा होतो.

काळ्या टरबुजात 92% पाणी असते. हे फळ तुम्हाळा उन्हाळ्यात पाण्याची कमतरता पूर्ण करण्यात मदत करते. प्रत्येक दिवशी फक्त एक टरबूज फायदेशीर असते. हे फळ खाल्ल्याने तुम्हाला भूक कमी लागते. सोबतच तुमच्या जेवणाची भूकही शांत होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad