इंटरनेटविना देखील पाहता येतात YouTube व्हिडीओ - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

07 May 2024

इंटरनेटविना देखील पाहता येतात YouTube व्हिडीओ


मुंबई - YouTube हे सध्या करमणुकीच मोठं साधन आहे. युट्युब अ‍ॅपवरून लोक आपल्या आवडीचे चित्रपट पाहतात आणि गाणी ऐकतात. परंतु अनेकदा इंटरनेट नसल्यामुळे युट्युबवर व्हिडीओ प्ले करता येत नाहीत, परंतु तुम्ही इंटरनेटविना देखील युट्युबवर आवडीचे व्हिडीओ प्ले करू शकता. युट्युबनं ऑफलाइन व्हिडीओ सेव्ह करण्याची सुविधा दिली आहे.

म्हणजे जेव्हा तुमच्याकडे इंटरनेट उपलब्ध असतं तेव्हा तुमच्या फोनमध्ये व्हिडीओ डाउनलोड करता येतात, त्यानंतर ते कधीही प्ले करता येतात.त्यामुळे तुमचा इंटरनेट डेटा संपत नाही. तसेच इंटरनेट नसलेल्या भागात देखील युट्युब व्हिडीओ प्ले करू शकाल. अनेकजण रोज काही ठराविक गाणीच पुन्हा पुन्हा ऐकतात. अश्या युजर्ससाठी ऑफलाइन युट्युब व्हिडीओ प्ले एक चांगला ऑप्शन ठरू शकतो.

ऑफलाइन युट्युब व्हिडीओ कसे प्ले करायचे? -
जो यूट्यब व्हिडीओ ऑफलाइन मोडमध्ये सेव्ह करायचा आहे तो पण करा.
त्यांनतर व्हिडीओ प्ले झाल्यानंतर खालच्या बाजूला डाउनलोड ऑप्शन दिसेल.
या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करा.
त्यानंतर ज्या व्हिडीओ क्वॉलिटी मध्ये युट्युब व्हिडीओ सेव्ह करायचा आहे त्याचा ऑप्शन दिला जाईल.
यात तुम्ही तुमच्या इंटरनेट डेटा किंवा वाय-फायचा विचार करून Low (१४४पी), Medium (३६०पी), High (७२०पी), Full HD (१०८०पी) चा ऑप्शन दिसेल.
विशेष म्हणजे जर तुम्हाला जास्त हाय क्वॉलिटी व्हिडीओ डाउनलोड करायचे असतील तर तुमचा इंटरनेट डेटा जास्त खर्च होईल. एकदा व्हिडीओ डाउनलोड केल्यावर तुम्ही इंटरनेट डेटाविना कुठेही युट्युब व्हिडीओ प्ले करू शकता.

किती युट्युब व्हिडीओ ऑफलाइन डाउनलोड करता येतात -
ऑफलाइन मोड मध्ये युट्युब व्हिडीओ तुमच्या फोन किंवा टॅबलेटच्या इंटरनल स्टोरेजमध्ये सेव्ह होतात. म्हणजे तुमच्या फोनच्या स्पेसचा वापर केला जातो. त्यामुळे तुम्ही किती युट्युब व्हिडीओ सेव्ह करू शकता हे तुमच्या फोनच्या स्टोरेजवर अवलंबून असेल. एक महत्वाची सूचना म्हणजे करी व्हिडीओ ऑफलाईन पाहता येत असले तरी काही काळाने एकदा तरी युट्युब इंटरनेटशी कनेक्ट केलं पाहिजे म्हणजे हे डाउनलोड रिन्यू होतात.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad