मुंबई - भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा देशाच्या पहिल्या लोकसभा निवडणुकीत दक्षिण मुंबईच्या मतदार संघात काँग्रेस पक्षाने पराभव केला होता. महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या अवमानाचा बदला घेण्यासाठी आंबेडकरी समाजातुन पुढे आलेल्या महायुतीच्या उमेदवार यामीनी यशवंत जाधव या भिमकन्येला विजयी करण्याचा निर्धार करा असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. (Marathi Latest News) (Mumbai News)
दक्षिण मुंबईच्या महायुतीच्या उमेदवार यामिनी यशवंत जाधव यांनी रामदास आठवले यांची सदिच्छा भेट घेऊन आशीर्वाद घेतले. यावेळी शिवसेना नेते यशवंत जाधव, रिपाइंचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर, मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे, सचिन मोहिते, जिल्हा अध्यक्ष संजय पवार, आदि मान्यवर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment