शिरुर - दिलीपराव वळसे पाटलांचा शपथविधी झाला की, याची सटकली. हा म्हणाला दादांनी याला मंत्रीमंडळात घ्यायला नको होते. आता आपले काही जमणार नाही. त्यांच्या डाव्या आणि उजव्या बाजूला बसलेल्या आमदारांना त्यांनी सांगितले. मला त्या आमदारांनी घरी आल्या आल्या सांगितले की, ते असे म्हणत होता आणि नंतर तो तिकडे गेला. त्याला गाजर दाखवण्यात आले आहे. त्याला साहेबांनी सांगितले की, पुढच्या वेळेस तुच मंत्री होणार आहे. (Marathi Latest News)
आता पुढच्या वेळेस मंत्री होण्यासाठी त्याने कारखान्याची वाट लावली, बाकीच्या सगळ्यांची वाट लावली. आता मंत्री व्हायला निघालायस, पठ्ठ्या तू आमदार कसा होतो तेच बघतो असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरुरचे आमदार अशोक पवार यांना आव्हान दिले आहे. महायुतीचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ अजित पवार यांनी सभा घेतली. यावेळी ते बोलत होते.
अजित पवार म्हणाले, घोडगंगा कारखाना अडचणीत आहे. त्यातून मार्ग काढता येऊ शकेल. मात्र संचालक मंडळ एकत्रित हवे. अमोल कोल्हे सेलिब्रेटी आहेत असे सांगून पाच वर्षांत लोकांकडे गेले नाहीत. तुमचे प्रश्न केंद्र आणि राज्य सरकार एकत्रित सोडवू शकते. शरद पवारांनी शिरुरचे आमदार अशोक पवार यांना मंत्रिपदाचे गाजर दाखवले आहे, त्यामुळे ते आपल्यासोबत आले नाहीत. अजित पवाराने जर ठरवले तर एखाद्याला आमदार नाही म्हणजे नाही होऊ देत. तुझी औकात काय आहे? असे म्हणत अजित पवारांनी अशोक पवारांना दम देण्याचा प्रयत्न केला आहे.
No comments:
Post a Comment