१२ ते १३ जूनला मान्सून महाराष्ट्रात ! - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

09 May 2024

१२ ते १३ जूनला मान्सून महाराष्ट्रात !मुंबई - सध्या राज्यासह देशातील इतर भागात मोठ्या प्रमाणात तापमानात वाढ झाली आहे. अनेक ठिकाणी पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे लोक मोठ्या आशेने मान्सूनच्या आगमनाची वाट बघत आहेत. मागील वर्षी देखील पुरेसा पाऊस पडला नाही. त्यामुळे पाण्याची टंचाई भासत आहे. दरम्यान, हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी देशात मे अखेर मान्सून दाखल होणार आहे. अर्थात २२ मे रोजी मान्सूनचे अंदमानात आगमन होईल, असे सांगितले. त्यानंतर १२ ते १३ जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल, असे म्हटले आहे.

नुकत्याच काही दिवसांपूर्वी हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी मान्सून संदर्भातील आपला पहिला अंदाज जारी केला होता. मान्सून २०२४ मध्ये चांगला पाऊस राहणार असे त्यांनी म्हटले होते. डख यांनी सांगितल्याप्रमाणे ज्यावर्षी उन्हाळ्यात जास्त पाऊस पडतो, त्या पावसाळ्यात नेहमीच कमी पाऊस पाहायला मिळतो. गेल्या वर्षी अर्थातच २०२३ मध्ये अशीच परिस्थिती पाहायला मिळाली होती. यंदा मात्र उन्हाळ्यात फारसा पाऊस झालेला नाही. परिणामी पावसाळ्यात समाधानकारक पाऊस होणार आहे, असा अंदाज डख यांच्या माध्यमातून वर्तवण्यात आला.

राज्यात १२ ते १३ जूनदरम्यान मान्सून दाखल होणार असला तरी यंदा पावसाळ््यात २२ जूननंतर पेरणीयोग्य पाऊस पडेल. जुलै, सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये जोरदार पाऊस होणार असल्याचा अंदाजही डख यांनी वर्तवला आहे. २५ ते २७ जूनदरम्यान पेरणीयोग्य पाऊस पडू शकतो, असा अंदाज वर्तवला. यासंबंधीची माहिती पंजाबराव डख यांनी दिली. जूनच्या शेवटच्या आठवड्यात राज्यातील बहुतांशी शेतक-यांच्या खरीप हंगामातील पेरण्या पूर्ण होतील, असा विश्वास पंजाबराव डख यांनी व्यक्त केला. यंदा जुलै महिन्यात जास्तीचा पाऊस, ऑगस्ट महिन्यात कमी पाऊस आणि सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात जोरदार पाऊस होणार, असे भाकीत त्यांनी व्यक्त केले. एकंदरीत पंजाबरावांनी यावर्षी खूपच चांगला मान्सून राहणार असा अंदाज दिला आहे. तसे झाल्यास पुढील वर्षी पाणी टंचाई दूर होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

२२ जूननंतर पेरणीयोग्य पाऊस -
पंजाबराव डख यांनी यंदा २२ मे रोजी मान्सूनचे अंदमानात आगमन होणार असल्याची माहिती दिली तर महाराष्ट्रात १२ ते १३ जूनच्या आसपास मोसमी पावसाला सुरुवात होणार असल्याचे पंजाबराव डख यांनी म्हटले. मात्र, राज्यात पेरणीयोग्य पावसाला २२ जूननंतर सुरुवात होईल, अशी माहिती देखील डख यांनी दिली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages