
मुंबई - रेमल वादळामुळे मान्सूनच्या प्रवासाला वेग आला असून लवकरच मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे लवकरच उन्हाच्या तडाख्यापासून लवकरच सुटका होणार हे मात्र नक्की. येत्या 10 किंवा 11 जूनला मुंबई पावसाची सुरुवात होणार असून 15 जूनपासून मान्सून महाराष्ट्र व्यापेल, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. दरम्यान महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश, ओडिशा, छत्तीसगड, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये यंदा सरासरीपेक्षा 106 टक्के अधिक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment