उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघात सात उमेदवारी अर्ज दाखल - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

30 April 2024

उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघात सात उमेदवारी अर्ज दाखल

 

मुंबई - लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील २८ – मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघात (North East Lok Sabha Constituency) २६ एप्रिल रोजी अर्ज स्विकृती प्रक्रियेस सुरवात झाली. आज सात उमेदवारांनी (nominations) अर्ज दाखल केले असल्याची माहिती मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दादाराव दातकर यांनी दिली आहे.

28 - मुंबई उत्तर पूर्व या मतदारसंघातून आज संजय दिना पाटील (शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे), प्रग्नेश हर्षदराय दोशी (अपक्ष), संजय सावजी देशपांडे (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया), प्रेम रमापती गुप्ता (बहुजन मुक्ती पार्टी), भुपिंदर सिंह सैनी (वींरो के वीर इंडियन पार्टी), धमेंद्रकुमार मिश्रा (अपक्ष), शहाजी थोरात (अपक्ष) या उमेदवारांनी आज अर्ज दाखल केला आहे.

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात मुंबई उपनगर जिल्ह्यात २० मे रोजी मतदान होणार आहे. मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघाअंतर्गत १५५ – मुलुंड, १५६ – विक्रोळी, १५७ – भांडूप पश्चिम, १६९ – घाटकोपर पश्चिम , १७० – घाटकोपर पूर्व, १७१ – मानखुर्द शिवाजीनगर हे विधानसभा मतदारसंघ आहेत.

या निवडणुकीसाठी अर्ज स्विकृतीची अंतिम तारीख ३ मे (दुपारी ३.०० पर्यंत) आहे. नामनिर्देशन पत्राची छाननी प्रक्रिया ४ मे २०२४ रोजी सकाळी ११ .०० वाजेपासून सुरू होणार आहे. तर उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची अंतीम तारीख ६ मे रोजी दुपारी ३.०० वाजेपर्यंत असणार आहे. २० मे रोजी सकाळी ७.०० ते सायंकाळी ६.०० पर्यंत मतदान होणार आहे. तर ४ जून रोजी मतमोजणीची प्रक्रिया उदयांचल शाळा गोदरेज संकुल, विक्रोळी येथे करण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages