Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत विरुद्ध यामिनी जाधव


मुंबई - लोकसभा निवडणुकीत दक्षिण मुंबईमधून खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsena UBT) पक्षाकडून पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. सावंत यांच्या विरोधात कोण उमेदवार असतील हे महायुतीकडून स्पष्ट होत नव्हतं. अखेर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या शिवसेनेकडून आमदार यामिनी जाधव (Byculla MLA Yamini Jadhav) यांचे उमेवार म्हणून नाव जाहीर करण्यात आलंय. त्यामुळे दक्षिण मुंबईतील (South Mumbai Lok Sabha) लढतीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मुंबईत 20 मे रोजी मतदान होणार आहे. (Arvind Sawant vs Yamini Jadhav from South Mumbai)

यामिनी जाधव या २०१२ साली मुंबई महापालिकेत शिवसेनेच्या तिकिटावर नगरसेविका म्हणून निवडून आल्या. त्यांनी महापालिकेत विविध समित्यांवर काम केलं आणि आपली छाप उमटवली. भायखळा विधानसभा मतदारसंघ हा तसा मुस्लिमबहुल मतदारसंघ आहे. या मतदार संघातून २०१९ मध्ये यामिनी जाधव या आमदार म्हणून निवडून आल्या आहेत. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर यामिनी जाधव यांनी ठाकरेंची साथ सोडत शिंदेंना साथ दिली होती. शिंदे गटात असलेल्या यामिनी जाधव या भायखळा मतदारसंघाच्या आमदार आहेत. एकेकाळी ठाकरेंचे विश्वासू अशी ओळख असलेल्या यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांच्या त्या पत्नी आहेत. यामिनी जाधव यांनी गुवाहाटीतून उद्धव ठाकरेंच्या कार्यशैलीवर टीका केली. आपण आजारी असताना उद्धव ठाकरे वा ठाकरे परिवारातील कोणीही आपली विचारपूस केली नसल्याचा आरोप त्यांनी केला होता. महायुतीने दाखवलेला विश्वास सार्थ करू अशी प्रतिक्रिया यामिनी जाधव यांनी दिली आहे.

१५ दिवासांपूर्वीच हा निर्णय -
मुंबईत तीन जागा भाजपने आणि तीन शिवसेनेने लढाव्या हा निर्णय आधीच झाला होता-फडणवीस हा निर्णय आधीच झाला होता मुंबईत तीन जागा भाजपने लढवावा आणि तीन जागा शिवसेनेने लढवा असा निर्णय १५ दिवासांपूर्वीच हा निर्णय झाला होता अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Voter Information & Services

Ads Bottom