उत्तर पूर्व मतदारसंघासाठी स्तुती चरण निवडणूक निरीक्षक - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

03 May 2024

उत्तर पूर्व मतदारसंघासाठी स्तुती चरण निवडणूक निरीक्षक


मुंबई - लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी २८- मुंबई उत्तर पूर्व या मतदारसंघासाठी सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक म्हणून भारत निवडणूक आयोगाने भारतीय प्रशासकीय सेवेतील वरीष्ठ अधिकारी स्तुती चरण (IAS) यांची नियुक्ती केली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दादाराव दातकर यांनी दिली आहे. (Stuti Charan Election Inspector for North East Constituency) (Marathi News) (Marathi Batmya)
 
उमेदवारांना अथवा नागरिकांना निवडणूक संदर्भात संपर्क साधावयाचा असल्यास 8591366725 या भ्रमणध्वनीवर अथवा 22-20852870 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन निवडणूक निरीक्षक स्तुती चरण यांनी केले आहे. निवडणूक निरीक्षक स्तुती चरण यांचा पत्ता - नंबर ३, पहिला मजला, आर्क गेस्ट हाऊस, आरसीएफ, चेंबुर, मुंबई – 400 074 असा आहे. 
                          
निवडणूक निरीक्षक स्तुती चरण यांनी आज २८ – मुंबई उत्तर पुर्व लोकसभा मतदार संघाच्या विक्रोळी येथील कार्यालयात आढावा बैठक घेतली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दादाराव दातकर, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत पाटील, नोडल अधिकारी सीताराम काळे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी रवींद्र ठाकरे, पांडुरंग मगदुम, डॉ. जयश्री कतारे  उपस्थित होते. 

यावेळी त्यांनी नामनिरर्देशन व्यवस्था, घरपोच मतदान, पोस्टल बॅलेट मतदानाच्या तयारीचा आढावा घेतला. आदर्श आचारसंहिता आणि संवेदनशील भागात सतर्कता बाळगावी अशा सूचना देत मुक्त आणि नि:पक्ष मतदान घेण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्याचे आवाहन निवडणूक निरीक्षक स्तुती चरण यांनी केले आहे. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad