मुंबई - बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून यंदा ४,८५६.३८ कोटी रुपये इतका मालमत्ता कर (Property Tax) संकलित करण्यात आला आहे. सन २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी ४,५०० कोटी रुपये कर संकलनाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. त्याहून सुमारे ३५६.३८ कोटी रुपये अधिक म्हणजे १०८ टक्के कर संकलन करून कर निर्धारण आणि संकलन विभागाने उत्तम कामगिरी नोंदवली आहे. तसेच, या आर्थिक वर्षाचा मालमत्ता कर भरण्यासाठी दिनांक २५ मे २०२४ हा अंतिम दिवस होता. या अंतिम दिनांकापर्यंत करभरणा न करणाऱ्या मालमत्ता धारकाना आता दरमहा २ टक्के दंड आकारण्यात येणार आहे. (Mumbai Latest News)(Marathi News)
महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांच्या मार्गदर्शनाखाली, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या निर्देशांनुसार, बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील मालमत्ताधारकांकडून करसंकलन करण्यासाठी करनिर्धारण व संकलन खात्याकडून प्रयत्न करण्यात आले. सहआयुक्त (कर निर्धारण व संकलन) सुनील धामणे यांच्या निरीक्षणाखाली संपूर्ण यंत्रणेने मागील दोन महिने कर संकलनासाठी नियोजनबद्ध आणि सातत्याने प्रयत्न केले.
आर्थिक वर्ष २०२३-२४ चा मालमत्ता कर भरण्यासाठी दिनांक २५ मे २०२४ हा अंतिम दिवस होता. मालमत्ता धारकांनी दिलेल्या मुदतीत करभरणा करावा आणि दंडात्मक तसेच कायदेशीर कारवाई टाळता यावी, यासाठी महानगरपालिका प्रशासनाकडून प्रसारमाध्यमे, समाजमाध्यमे आदीद्वारे सातत्याने आवाहन करण्यात आले. करभरणा करण्यासाठी मालमत्ता धारकांची गैरसोय टाळण्यासाठी सर्व विभागातील नागरी सुविधा केंद्रे रविवारी, शनिवार आणि सार्वजनिक सुटीच्या दिवशीही सुरू ठेवण्यात आले होते. तसेच या कालावधीत मालमत्ता करासंबंधीत अडचणींच्या निराकरणासाठी सर्व विभागांमध्ये करनिर्धारण व संकलन खात्याचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
या पार्श्वभूमीवर, करनिर्धारण व संकलन खात्याकडून यंदा ४,८५६.३८ कोटी रुपये इतका मालमत्ता कर संकलित करण्यात आला आहे. यामध्ये शहर विभागातील १ हजार ४२५ कोटी ०१ लाख ३१ हजार रुपये, पश्चिम उपनगरातील २ हजार ४५५ कोटी ९० लाख ५७ हजार रुपये आणि पूर्व उपनगरातील ९६८ कोटी १३ लाख ५८ हजार रुपये तसेच शासकीय, बंदर आणि रेल्वे यांच्या अखत्यारीतील मालमत्ताच्या १० कोटी ४८ लाख २१ हजार इतक्या कर रकमेचा समावेश आहे.
सन २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी निश्चित करण्यात आलेल्या ४,५०० कोटी रुपये मालमत्ता कराच्या उद्दिष्टापेक्षा अधिक (१०७.९५%) कर संकलित करण्यात आला आहे. दिनांक २५ मे २०२४ रोजी १७०.५९ कोटी तर, दिनांक २६ मे २०२४ रोजी १.५२ कोटी रुपये इतका मालमत्ता कर संकलित करण्यात आला.
विभागनिहाय मालमत्ता कर संकलनाची आकडेवारी -
ए विभाग- २१४ कोटी ९१ लाख ४९ हजार रुपये
बी विभाग- ३३ कोटी ९५ हजार ०२ लाख रुपये
सी विभाग- ६१ कोटी २२ लाख ४९ हजार रुपये
डी विभाग- १९३ कोटी ०२ लाख ४३ हजार रुपये
ई विभाग- १०५ कोटी २६ लाख ३४ हजार रुपये
एफ दक्षिण विभाग- १०० कोटी २६ लाख ३४ हजार रुपये
एफ उत्तर विभाग- ११४ कोटी १९ लाख २८ हजार रुपये
जी दक्षिण विभाग- ४१९ कोटी ५३ लाख ८९ हजार रुपये
जी उत्तर विभाग- १८२ कोटी ७४ लाख ५९ हजार रुपये
एच पूर्व विभाग- ४५६ कोटी ६६ लाख ६८ हजार रुपये
एच पश्चिम विभाग- ३०१ कोटी २४ लाख ८१ हजार रुपये
के पूर्व विभाग- ४६३ कोटी ५८ लाख ०१ हजार रुपये
के पश्चिम विभाग- ४०६ कोटी ८१ लाख ४२ हजार रुपये
पी दक्षिण विभाग- २७० कोटी ४० लाख २५ हजार रुपये
पी उत्तर विभाग- १८० कोटी ७२ लाख २२ हजार रुपये
आर दक्षिण विभाग- १४३ कोटी ८९ लाख ७६ हजार रुपये
आर मध्य विभाग- १७० कोटी १९ लाख ९८ हजार रुपये
आर उत्तर विभाग- ६२ कोटी ३७ लाख ४४ हजार रुपये
एल विभाग विभाग- २११ कोटी ३० लाख ४५ हजार रुपये
एम पूर्व विभाग- ७३ कोटी ३१ लाख ५५ हजार रुपये
एम पश्चिम विभाग- १०३ कोटी ३४ लाख ११ हजार रुपये
एन विभाग विभाग- १६१ कोटी ६१ लाख ९८ हजार रुपये
एस विभाग विभाग- २८२ कोटी ३० लाख ४४ हजार रुपये
टी विभाग विभाग- १३६ कोटी २५ लाख ०५ हजार रुपये
No comments:
Post a Comment