शौचालये, स्वच्छतेबाबत मुंबईची स्थिती काळजी करण्यासारखी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

28 May 2024

शौचालये, स्वच्छतेबाबत मुंबईची स्थिती काळजी करण्यासारखी



मुंबई - सार्वजनिक शौचायले आणि सामुदायिक स्वच्छताबाबत महाराष्ट्रातील आणि देशातील दहा लाख पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांच्या तुलनेत मुंबईची श्रेणी बरीच खालची आहे. महाराष्ट्रातील शहरांमध्ये मुंबईचे श्रेणी 37 तर देशातील शहरांमध्ये मुंबईची श्रेणी अधिक घसरून 189 झाली आहे. एक जागतिक महानगर आणि देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईची ही स्थिती काळजी करण्यासाठी असून त्याची कारणे शोधून उपाययोजना करणे आवश्यक आहे, असे मत प्रजा फाऊंडेशनचे प्रमुख संशोधन आणि विश्लेषक योगेश मिश्रा यांनी व्यक्त केले. (Mumbai News)

प्रजा फाऊंडेशन या संस्थेकडून मुंबईच्या शौचालयांबाबतचा अहवाल मुंबई प्रेस क्लब येथे जाहीर करण्यात आला. या अहवालातून ही आकडेवारी समोर आली आहे. 2023 च्या आकडेवारीनुसार मुंबईत दर 4 सार्वजनिक शौचालयातील केवळ 1 शौचालय स्त्रियांसाठी आहे. एका सार्वजनिक शौचालयाचा वापर करणाऱ्या पुरुषांची संख्या 752, तर स्त्रियांची संख्या 1820 आहे. स्वच्छ भारत अभियानानुसार एका शौचालयाचा वापर करणाऱ्या पुरुषांची संख्या 35 आणि स्त्रियांची संख्या 25 असायला पाहिजे. मात्र, एका शौचालयामागे वापरकर्त्यांचे प्रमाण पुरुषांसाठी 100-400 तर स्त्रियांसाठी 100-200 इतके आहे. मुंबईत एका सामुदायिक शौचालयाचा वापर करणाऱ्या पुरुषांची संख्या 86 आणि स्त्रियांची संख्या 81 आहे.

सार्वजनिक शौचायले आणि सामुदायिक स्वच्छता संकुले कशी व किती असावीत याचे स्पष्ट मापदंड स्वच्छ भारत अभियानात दिलेले आहेत. शहरातील स्वच्छता व आरोग्य स्थितीची तपासणी वार्षिक स्वच्छता सर्वेक्षणातून घेतली जाते. 2023 मधील सर्वेक्षणानुसार मुंबईमध्ये उघड्यावरील शौचास जाणे बंद झाले आहे. सार्वजनिक शौचालय सुविधांनी स्वच्छतेच्या बाबतील 90 टक्के गुण संपादित केले आहेत. 

मुंबईत सध्या उपलब्ध असलेली सार्वजनिक शौचालये (82,407) स्वच्छ भारत अभियानाच्या मापदंडांनुसार इथल्या केवळ एक-तृतीयांश झोपडपट्टीवासियांसाठी पुरेशी आहेत. मुंबईतील एकूण सार्वजनिक स्वच्छता संकुलांपैकी (6,800), 69 टक्के शौचालयामध्ये पाण्याची जोडणी नाही आणि 60 टक्केमध्ये वीज जोडणी नाही. 2023 वर्षातील एकाही महिन्यामध्ये मुंबईतील हवेची गुणवत्ता सरासरी चांगली असल्याची नोंद नाही. 2019 ते 2023 या कालावधीमध्ये वायू प्रदूषणाशी संबंधित तक्रारींचे प्रमाण 305 टक्क्यांनी वाढले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad