Mega block - १, २ जूनला ६०० लोकल रद्द, ३६ तासांचा ब्लॉक - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

28 May 2024

Mega block - १, २ जूनला ६०० लोकल रद्द, ३६ तासांचा ब्लॉक



मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) स्थानकातील मेल एक्सप्रेस गाड्यांचे प्लॅटफॉर्म विस्तारीकरण आणि यार्ड नूतनीकरणाच्या कामासाठी १ आणि २ जून रोजी मध्य रेल्वे ३६ तासांचा ब्लॉक घेण्याचे नियोजन करत आहे. या ब्लॉकमुळे मुख्य आणि हार्बर मार्गावरील सुमारे ६०० लोकल रद्द होण्याची शक्यता आहे. (Mumbai Latest News)(Mega Block)

सीएसएमटी स्थानक ऐतिहासिक आहे. देशातील सर्वात व्यस्त टर्मिनस म्हणून या स्थानकाची ओळख आहे. सीएसएमटी स्थानकातून उपनगरीय लोकल आणि लांब पल्याच्या मेल-एक्स्प्रेस गाड्या चालविण्यात येतात. तर मध्य रेल्वेच्या मुख्य लाईन आणि हार्बर मार्गावर दररोज १ हजार ८१० लोकल चालविण्यात येतात. त्यापैकी १ हजार २९९ हून अधिक लोकल सीएसएमटी स्थानकातून ये-जा करतात. सीएसएमटी स्थानकातील मेल एक्स्प्रेस गाड्यांच्या प्लॅटफॉर्मच्या विस्तारीकरणाचे मध्य रेल्वेने हाती घेतले आहे. प्लॅटफॉर्म १० ते १४ चा विस्तार २४ डब्यांच्या गाड्या चालविण्यासाठी करण्यात येत असून हे काम शेवटच्या टप्प्यात आहे. प्लॅटफॉर्मचा विस्तार सुमारे ३०५ ते ३८२ मीटरपर्यंत वाढविण्यात येत असल्याने गाड्यांचे डब्बे वाढविण्यात येणार आहेत. यामुळे प्रवासी वहन क्षमता २० टक्क्यांनी वाढणार आहे.

तसेच यार्ड रिमॉडेलिंग आणि अत्यावश्यक सेवा इमारतींच्या बांधकामासोबत प्रकल्पामध्ये ६१ जुने ओव्हर-हेड इक्विपमेंट मास्ट्स, ७१ सिग्नलिंग आणि टेलिकम्युनिकेशन अडथळे काढण्यात येणार आहेत. अपग्रेडेशनच्या कामात रुट रिले इंटरलॉकिंगपासून इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगपर्यंत ट्रॅकच्या कामाचा समावेश आहे. या कामासाठी मध्य रेल्वेचे अधिकारी ब्लॉक घेण्याचे नियोजन करत आहेत. याबाबत मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

वडाळा ते सीएसएमटी आणि भायखळा ते सीएसएमटी लोकल सेवा बंद -
शनिवार, १ जून रोजी मध्यरात्रीनंतर ब्लॉक सुरू होण्याची शक्यता आहे. या ब्लॉक दरम्यान हार्बर मार्गावरील लोकल वडाळा ते सीएसएमटी आणि मुख्य मार्गावर भायखळा ते सीएसएमटी लोकल सेवा बंद ठेवण्याचा विचार अधिकारी करत आहेत. तसेच १०० लांब पल्ल्यांच्या गाड्यांपैकी सुमारे ६० टक्के गाड्यांवरही ब्लॉकमुळे परिणाम होण्याची शक्यता आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad