राज्याचा बारावीचा निकाल 93.37 टक्के - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

21 May 2024

राज्याचा बारावीचा निकाल 93.37 टक्के


पुणे / मुंबई - महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा बारावीचा निकाल 93.37 टक्के लागला आहे. यंदाही निकालात कोकण विभागानं बाजी मारली आहे. 91.51 टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल ठरला आहे. तर 91.95 टक्क्यांसह मुंबई विभाग तळाशी आहे. यंदाही बारावीच्या निकालात मुलींनी मारली बाजी मारली आहे. 95.44 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर मुलांच्या निकालाची टक्कवारी 91.60 टक्के आहे. (Maharashtra HSC Results 2023 Declare) (12th Results)

विभागनिहाय निकाल
कोकण : 97.51 टक्के
पुणे : 94.44 टक्के
कोल्हापूर : 94.24 टक्के
अमरावती : 93 टक्के
छत्रपती संभाजीनगर : 94.08 टक्के
नाशिक : 94.71 टक्के
लातूर : 92.36 टक्के
नागपूर : 93.12 टक्के
मुंबई : 91.95 टक्के

कुठे पाहता येणार निकाल?
mahresult.nic.in
http://hscresult.mkcl.org
www.mahahsscboard.in
https://results.digilocker.gov.in
http://results.targetpublications.org

कसा पाहाल निकाल?
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीचा निकाल ऑनलाईन जाहीर केला जाणार आहे.
निकाल बघण्यासाठी शिक्षण मंडळाच्या www.mahresult.nic.in या अधिकृत संकेतस्थळाचा किंवा इतर वेबसाईटचा वापर करता येईल.
संकेतस्थळाच्या लिंकवर क्लिक केल्यानंतर त्याचं होमपेज ओपन होईल. तेथे महाराष्ट्र बोर्ड एचएससी निकाल 2024 या ऑप्शनवर क्लिक करा.
या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला समोर तुमचा सीट क्रमांक किंवा परीक्षा क्रमांक टाकण्याचा ऑप्शन दिसेल. काही संकेतस्थळांवर तुम्हाला रोल नंबर किंवा शाळेचा कोड विचारला जाऊ शकतो. विचारण्यात आलेली माहिती भरुन सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमचा निकाल दिसेल.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad