शिवसेना ठाकरे गटाचे पोलिंग एजंट मनोहर नलगे (वय ६२) यांचा निवडणूक कर्तव्यावर असताना मृत्यू झालाय. वरळीच्या डेलीसले रोडवरील मतदान केंद्रातील टॉयलेटमध्ये ही घटना घडली. आजारी पडल्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
दुसऱ्या घटनेमध्ये निवडणूक अधिकाऱ्याचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झालाय. रिपोर्टनुसार, सुनिल लक्ष्मन (वय ५२) यांना परेळमधील भोईवाडातील सेंट पॉल हाय स्कूलमध्ये ड्युटी लावण्यात आली होती. त्यावेळी त्यांना झटका आला. त्यानंतर त्यांना केईएम हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. पण, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
No comments:
Post a Comment