मुंबई - मध्य रेल्वेवर २६.५.२०२४ (रविवार) रोजी सकाळी ११.०५ ते दुपारी ३.३५ पर्यंत माटुंगा आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धिम्या मार्गावर तसेच हार्बर मार्गावर अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मेगा ब्लॉक (Mega Block) घेण्यात आला आहे. या ब्लॉकची माहिती घेवुन प्रवाशांनी प्रवास करावा असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे. (Mumbai News) (Latest News)(Mega Block Update)
२६ मे २०२४ (रविवार) रोजी सकाळी ११.०५ ते दुपारी ३.३५ पर्यंत माटुंगा आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धिम्या मार्गावर ब्लॉक घेण्यात आला आहे. या ब्लॉक दरम्यान सकाळी १०.१४ ते दुपारी ३.०९ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सुटणाऱ्या डाऊन धिम्या मार्गावरील सेवा माटुंगा आणि ठाणे स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येईल आणि त्या विद्याविहार, कांजूरमार्ग, नाहूर रेल्वे स्थानकावर थांबणार नाहीत आणि पुढे ठाणे स्थानकांवर डाऊन धीम्या मार्गावर वळवल्या जातील आणि आणि १५ मिनिटे उशिराने गंतव्य स्थानकावर पोहोचतील.
सकाळी १०.२५ ते दुपारी ३.१० वाजेपर्यंत कल्याण येथून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील सेवा ठाणे आणि माटुंगा रेल्वे स्थानकादरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येईल आणि त्या नाहूर, कांजूरमार्ग आणि विद्याविहार रेल्वे स्थानकावर थांबणार नाहीत आणि पुढे माटुंगा स्थानकावर अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील आणि १५ मिनिटे उशिराने गंतव्य स्थानकावर पोहोचतील.
डाऊन धीमी मार्गिका:
ब्लॉकपूर्वी शेवटची लोकल टिटवाळा लोकल असेल जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ९.५३ वाजता सुटणार आहे.
ब्लॉकनंतर पहिली लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणारी कल्याण लोकल दुपारी ३.१८ वाजता सुटणार आहे.
अप धीमी मार्गिका:
ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल आसनगाव लोकल असेल जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे सकाळी ९.५५ वाजता पोहोचेल.
ब्लॉकनंतर पहिली लोकल टिटवाळा लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुपारी ३.२४ वाजता पोहोचेल.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - चुनाभट्टी/वांद्रे डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११.४० ते दुपारी ४.४० वाजेपर्यंत आणि चुनाभट्टी/वांद्रे- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात आला आहे. ब्लॉक कालावधीत सकाळी ११.१६ ते दुपारी ४.४७ वाजेपर्यंत वाशी/बेलापूर/पनवेल येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/वडाळा रोड येथून सुटणारी डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि वांद्रे/गोरेगाव येथे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा सकाळी १०.४८ ते दुपारी ४.४३ वाजेपर्यंत बंद राहतील.
पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सुटणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी सकाळी १०.४५ ते सायंकाळी ५.१३ पर्यंत अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.
डाऊन हार्बर मार्गावर ब्लॉक -
ब्लॉकपूर्वी पनवेलसाठी शेवटची लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ११.०४ वाजता सुटेल
गोरेगावसाठी ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.२२ वाजता सुटेल. ब्लॉकनंतर पनवेलसाठी पहिली लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दुपारी ०४.५१ वाजता सुटेल. ब्लॉकनंतर पहिली लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ०४.५६ वाजता वांद्रेसाठी सुटेल.
अप हार्बर मार्गावर ब्लॉक -
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी ब्लॉकपूर्वी शेवटची लोकल पनवेल येथून सकाळी ०९.४० वाजता सुटेल
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी ब्लॉकपूर्वी शेवटची लोकल वांद्रे येथून सकाळी १०.२० वाजता सुटेल
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी ब्लॉकनंतर पहिली लोकल पनवेल येथून दुपारी ३.२८ वाजता सुटेल
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी ब्लॉकनंतर पहिली लोकल गोरेगाव येथून दुपारी ०४.५८ वाजता सुटेल
ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्ला (प्लॅटफॉर्म क्र. ८) दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी १०.०० ते संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत मेन लाइन आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
मेगा ब्लॉक पायाभूत सुविधांच्या देखभाल आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहे. प्रवाशांना विनंती करण्यात येत आहे की, या पायाभूत सुविधांच्या ब्लॉकमुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाला कृपया सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment