घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटना, मृतांचा आकडा १४ वर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

14 May 2024

घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटना, मृतांचा आकडा १४ वर



मुंबई - मुंबईमधील घाटकोपरच्या छेडा नगर येथे मंगळवारी (१३ मे रोजी) तब्बल १२० बाय १२० फुटांचे बेकायदा महाकाय होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांची संख्या आता १४ झाली आहे. सध्या ४४ लोकांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत ३१ जखमींना डिस्चार्ज देण्यात आला आहे. (Mumbai Hording Collapse)

मिळालेल्या माहितीनुसार, राजावाडी हॉस्पिटलमध्ये सध्या ३८ (गंभीर १) जखमी उपचार घेत आहेत. या हॉस्पिटलमधील मृतांची संख्या ही १३ आहे. या हॉस्पिटल मधून २४ जणांना आतापर्यंत डिस्चार्ज मिळाला आहे. तर, सायन हॉस्पिटलमध्ये एका मृत्यूची नोंद झाली आहे. याशिवाय, केईएम रुग्णालयात ५ आणि कळवा येथील प्रकृती हॉस्पिटलमध्ये १ जखमी उपचार घेत आहे.

मृतांना वारसांना पाच लाखांची मदत -
घाटकोपर दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना राज्य सरकारकडून पाच लाखांची मदत करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे. घाटकोपर छेडा नगर येथे महाकाय होर्डिंग कोसळलेल्या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देत तेथील स्थितीचा आढावा घेतला. या दुर्घटनेस जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल, असे यावेळी शिंदे म्हणाले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad