भाजपाच्या प्रचार सभेत पंतप्रधानपदी राहुल गांधींचे नाव - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

02 May 2024

भाजपाच्या प्रचार सभेत पंतप्रधानपदी राहुल गांधींचे नावकोल्हापूर - भारतीय जनता पक्षाच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष शौमिका महाडिक यांचा कागल शहरातील प्रचार सभेतला व्हीडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. सभेत त्यांनी पंतप्रधानपदासाठी तुम्हाला कोण हवं? असा प्रश्न विचारला. त्यावर तरुणाने राहुल गांधींचे नाव घेतल्यामुळे एकच हशा पिकला.

दरम्यान, तिस-या टप्प्यात कोल्हापुरात लोकसभेसाठी ७ मे रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे मतदानाला अवघा आठवडाच उरला असल्याने प्रचाराचा धडाका सुरू आहे. भारतीय जनता पक्षाच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष शौमिका महाडिक यांनी कागल शहरात प्रचार सभा घेतली. यावेळी बोलताना त्यांनी जनतेला प्रश्न विचारला. तुम्हाला नरेंद्र मोदी पंतप्रधान हवे आहेत की, राहुल गांधी? यावर सभेत बसलेल्या एका कार्यकर्त्याने राहुल गांधींचे नाव घेतल्यामुळे एकच हशा पिकला. मिळालेल्या उत्तरामुळे महायुतीच्या नेत्यांसह शौमिका महाडिकही अवाक् झाल्या. देश कुणाच्या हातात द्यायचा आहे, असे म्हटल्यानंतर उपस्थितांनी राहुल गांधींचे नाव घेतल्याचा व्हीडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

मुश्रीफ पोट धरून हसले -
कोल्हापूरच्या कागलमध्ये महायुतीची झालेली प्रचारसभा चर्चेचा विषय बनली आहे. महायुतीच्या नेत्यासंमोरच तरुणाने चक्क राहुल गांधींच्या हातात देश देणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह व्यासपीठावरील नेत्यांसह उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी कागलमध्ये महायुतीच्या नेत्यांची सभा मंगळवारी पार पडली. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, खासदार संजय मंडलिक यांच्यासह महायुतीचे नेते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages