Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

कोविशिल्ड लसीमुळे मुलीचा मृत्यू?, ‘सिरम’विरोधात पालकांची न्यायालयात धाव



नवी दिल्ली - कोविशिल्ड लसीचे क्वचित प्रसंगी मानवी शरीरावर दुष्परिणामही होऊ शकतात, अशी कबुली ऍस्ट्राझेनेकाने प्रथमच ब्रिटनमधील एका न्यायालयात दिली. भारतामध्ये ऍस्ट्राझेनेका-ऑक्सफोर्ड विद्यापीठ आणि सिरम इन्स्टिट्यूट यांनी मिळून ही लस तयार केली होती. भारतीय बनावटीची ही लस फक्त भारतातच नव्हे, तर इतर अनेक देशांमध्येही पुरविण्यात आली होती. ऍस्ट्राझेनेकाच्या कबुलीनंतर आता सिरम इन्स्टिट्यूटविरोधात न्यायालयात जाण्याचा निर्णय एका मृत मुलीच्या पालकांनी घेतला आहे.

दिलेल्या एका वृत्तानुसार, रितिका श्री ओम्त्री (वय १८) या मुलीने मे २०२१ मध्ये कोविशिल्ड लसीचा पहिला डोस घेतला होता. त्यावेळी तिने नुकतीच बारावीची परीक्षा उत्तीर्ण करून आर्किटेक्चरचा अभ्यास सुरू केला होता. मात्र लस घेतल्यानंतर सात दिवसांतच तिला ताप आला. उलट्या आणि अशक्तपणा आल्यामुळे तिला साधे चालताही येत नव्हते. रितिकाला रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिचा एमआरआय रिपोर्ट काढण्यात आला. ज्यामध्ये तिच्या डोक्यात रक्ताच्या गुठळ्या झाल्याचे निदर्शनास आले. डोक्यात रक्तस्त्राव झाल्यामुळे दोन आठवड्यांतच रितिकाचा मृत्यू झाला.

रितिकाच्या पालकांना या घटनेमुळे प्रचंड हादरा बसला, पण त्यांनाही त्यावेळेस मृत्यूचे कारण कळले नाही. मात्र त्यांनी माहितीच्या अधिकाराचा वापर करून तिच्या मृत्यूचे कारण तपासण्याचा निर्णय घेतला. डिसेंबर २०२१ मध्ये त्यांना कळले की, रितिकाला ‘थ्रोब्मोसिस विथ थ्रोम्बोसायटोपेनिया’ हा आजार होता. लस घेतल्यानंतर दुष्परिणाम होऊन तिचा मृत्यू झाल्याचे पालकांना कळले.

जुलै २०२१ मध्ये वेणूगोपाल गोविंदन यांची मुलगी करुणाचा मृत्यू लस घेतल्यानंतर महिन्याभरताच झाला. करुणाचा मृत्यू लसीमुळेच झाला का? हे तपासण्यासाठी पुरेसे पुरावे नसल्याचे त्यावेळी त्यांना सांगण्यात आले होते. आता या दोन्ही मुलींच्या पालकांनी न्यायालयात धाव घेत ऍस्ट्राझेनेकाच्या दुष्पपरिणामुळेच आमच्या मुलींचा मृत्यू झाला, असा आरोप केला आहे. वकील जेमी स्कॉट यांच्यामार्फत न्यायालयात धाव घेण्यात आली आहे. स्वत: जेमी स्कॉट लसीमुळे पीडित आहेत. एप्रिल २०२१ मध्ये ऍस्ट्राझेनेका लस घेतल्यानंतर त्यांना मेंदूशी निगडित आजार जडला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Voter Information & Services

Ads Bottom