दीड कोटी लोकांनी खरेदी केला Redmi Note 13 series - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

05 May 2024

दीड कोटी लोकांनी खरेदी केला Redmi Note 13 series


मुंबई - रेडमी नोट सीरिज नेहमीच विक्रमी कामगिरी करते. लेटेस्ट Redmi Note 13 सीरीज देखील याला अपवाद राहिली नाही. जगभरात रेडमी नोट १३ सीरिजला जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे, अशी आकडेवारी समोर आली आहे. रेडमी इंडियानं सांगितलं आहे की कंपनीनं ग्‍लोबली १५ मिलियन म्हणजे १.५ कोटी ‘रेडमी नोट १३ ५जी' सीरीजचे यूनिट्स विकले आहेत. तसेच कंपनीनं Redmi Note 13 सीरीजवर डिस्‍काउंट देखील सादर केला आहे. भारतात ‘रेडमी १३' स्‍मार्टफोन्‍स आधीच खूप कमी किंमतीत विकले जात आहेत. फोन्‍स यावर्षी जानेवारीमध्ये लाँच करण्यात आला होता. या लाइनअप मध्ये Redmi Note 13 5G, Note 13 Pro 5G आणि Note 13 Pro+ 5G स्‍मार्टफोन आले आहेत. (technology gadget news)

डिस्काउंट -
Redmi Note 13 5G चा बेस मॉडेल ६जीबी रॅम व १२८जीबी ऑप्‍शन १७,९९९ रुपयांमध्ये लाँच करण्यात आला होता. याचा ८जीबी रॅम व २५६जीबी आणि १२जीबी रॅम व २५६जीबी व्हेरिएंट अनुक्रमे १९,९९९ आणि २१,९९९ रुपयांमध्ये आले होते. आता या फोनच्या ६ जीबी रॅम मॉडेलसाठी १६,९९९ रुपये, ८ जीबी रॅमसाठी १८,९९९ रुपये आणि १२ जीबी रॅमसाठी २०,९९९ रुपये खर्च करावे लागतील. याची विक्री सेल अ‍ॅमेजॉनवर होत आहे.

Redmi Note 13 Pro 5G च्या बेस मॉडेलमध्ये ८जीबी रॅमसह १२८जीबी स्टोरेज मिळते, ज्याची किंमत २५,९९९ रुपये होती. तर ८जीबी रॅम व २५६जीबी स्टोरेज मॉडेल २७,९९९ रुपयांमध्ये आला होता. तसेच १२जीबी रॅम व २५६जीबी मॉडेलची किंमत २९,९९९ रुपये होती. आता हे अनुक्रमे २४,९९९ रुपये, २६,९९९ रुपये, आणि २८,९९९ रुपयांमध्ये खरेदी करता येतील.

Redmi Note 13 Pro+ 5G ची भारतात लाँच प्राइस ३१,९९९ रुपये होती. ज्यात ८जीबी रॅमसह २५६जीबी स्टोरेज मिळते. फोनचा १२जीबी रॅम २५६जीबी स्टोरेज आणि १२जीबी रॅम व ५१२जीबी स्टोरेज मॉडेल लाँचच्या वेळी ३३,९९९ आणि ३५,९९९ रुपयांमध्ये उपलब्ध झाले होते. तर आता फोनच्या बेस व्हेरिएंटसाठी ३०,९९९ रुपये मोजावे लागतील. तर २५६जीबी जीबी मॉडेल ३२,९९९ रुपये आणि ५१२जीबी मॉडेल ३४,९९९ रुपयांमध्ये खरेदी करता येतील.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad