२ सिम कार्ड वापरणाऱ्यांच्या अडचणी वाढणार! - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

05 May 2024

२ सिम कार्ड वापरणाऱ्यांच्या अडचणी वाढणार!

मुंबई - जर तुम्ही फोनमध्ये दोन सिम कार्ड वापरत असाल तर तुमच्या अडचणीत वाढ होऊ शकते. कारण दुसरं सिम अ‍ॅक्टिव्हेट ठेवण्यासाठी जास्त खर्च करावा लागू शकतो. (Tariff Plan Price Hike)(Marathi News)

सध्या जिओ, एअरटेल आणि वोडाफोन आयडिया सिम अ‍ॅक्टिव्ह ठेवण्यासाठी कमीत कमी १५० रुपयांचा रिचार्ज करावा लागतो. परंतु टॅरिफ वाढल्यानंतर सिम अ‍ॅक्टिव्हेट ठेवण्यासाठी १५० रुपयांच्या ऐवजी १८० ते २०० रुपयांपर्यंत बेस प्लॅन जाऊ शकतो. त्यामुळे जर तुम्ही दोन सिम वापरत असाल तर तुम्हाला कमीत कमी ४०० रुपयांचा मंथली म्हणजे २८ दिवसांचा रिचार्ज करावा लागेल.

टेलिकॉम सेक्टरमध्ये येत्या काही दिवसांत टॅरिफ प्लॅनच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. याआधी डिसेंबर २०२१ मध्ये टॅरिफ प्लॅन्सच्या किंमती वाढल्या होत्या. त्यामुळे जवळपास अडीच वर्षांपेक्षा जास्त कालावधी गेला आहे आणि जिओ, एअरटेल आणि वोडाफोन आयडियाच्या प्लॅनमध्ये कोणताही बदल झाला नाही. त्यामुळे इंडस्ट्री एक्सपर्ट दावा करत आहेत की पुढील काही महिन्यात जिओ, एअरटेल आणि वोडाफोन आयडिया आपल्या प्रीपेड आणि पोस्टपेड रिचार्ज प्लॅनमध्ये दरवाढ करू शकतात.

जर तुम्ही मंथली ३०० रुपयांचा रिचार्ज करत असाल तर टॅरिफमध्ये वाढ केल्यावर प्रत्येक महिन्याला सुमारे ७५ रुपये जास्त द्यावे लागू शकतात. तसेच ५०० रुपयांचा मंथली रिचार्ज दरवाढीनंतर १२५ रुपयांनी महाग म्हणजे ६२५ रुपयांचा होऊ शकतो.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad