आता थर्ड पार्टी ॲपची गरज नाही, मोबाईलवर Caller चं नावं दिसणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

05 May 2024

आता थर्ड पार्टी ॲपची गरज नाही, मोबाईलवर Caller चं नावं दिसणार


मुंबई - जर तुमच्या स्मार्टफोनमध्ये कोणताही क्रमांक सेव्ह नसेल. तुम्हाला अनोळखी क्रमांकावरुन कॉल येत असेल, तर पहिला प्रश्न पडतो की हा फोन करतो तरी कोण? जर तुमच्या ट्रूकॉलर ॲप असेल तर समस्या नसते. पण अनेक जण सुरक्षेच्या कारणावरुन हे ॲप वापरत नाहीत. अशावेळी अनोळखी क्रमांक डोकेदुखी ठरतो. पण आता बोगस, फसवे कॉलर पकडल्या जातील. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI) देशभरातील टेलिकॉम कंपन्यांना कॉलरचे नाव दाखवायचे निर्देश दिले आहेत. कॉलिंग नेम प्रेझेंटेशन ही सुविधा सुरु झाल्यावर कोणत्याही व्यक्तीने, संस्थेने कॉल केला तर त्याचे नाव तुमच्या मोबाईल स्क्रीनवर दिसेल. (Technology Gadgets News) 

सध्या अनेक स्मार्टफोन युझर्स त्यांच्या मोबाईलमध्ये अनोळखी कॉलची माहिती घेण्यासाठी थर्ड पार्टी ॲप्सचा वापर करतात. त्यामध्ये अनेक युजर्स ट्रूकॉलरचा अधिक वापर करतात. थर्ड पार्टी ॲप्स त्यांची सेवा देण्यासाठी युझर्सकडून काही परवानग्या घेतात. त्यामध्ये कॉन्टॅक्ट, फोन गॅलरी, स्पीकर, कॅमेरा आणि कॉल हिस्ट्रीची माहिती घेण्यात येते. तुम्ही परवानगी न दिल्यास हे ॲप काम करत नाहीत. पण परवानगी दिल्यावर तुमचा डेटा किती सुरक्षित राहतो, याची खात्री देता येत नाही.

TRAI ने देशभरातील दूरसंचार कंपन्यांना कॉलिंग नेम प्रेझेंटेशन फीचर रोलआऊट करण्याचे निर्देश दिले आहे. त्यानंतर देशभरातील वापरकर्त्यांना त्यांच्या मोबाईल स्क्रीनवर कॉलरचे नाव दिसायला लागेल. ट्रायनुसार, जर ही ट्रायल यशस्वी झाली तर कॉलिंग नेम प्रेझेंटेशन फीचर देशभरात लागू होईल. वापरकर्त्यांना आता थर्ड पार्टी ॲपची गरज उरणार नाही. ट्रायने कॉलिंग नेम प्रेझेंटेशन फीचरच्या चाचणीसाठी देशातील एका लहान सर्कलची निवड केली आहे. हरियाणात कॉलिंग नेम प्रेझेंटशन फीचरची चाचणी होत आहे. याच महिन्यात ही चाचणी सुरु होत आहे. इथं या चाचणीला यश आल्यानंतर ती सर्व देशभर लागू करण्यात येणार आहे. त्यानंतर मोबाईलवर कॉलरचे नाव दिसू लागेल.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad