चुकीच्या नोंदणी क्रमांकाच्या व्हिंटेज कारमधून मुख्यमंत्र्यांचा कोस्टल रोड दौरा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

14 June 2024

चुकीच्या नोंदणी क्रमांकाच्या व्हिंटेज कारमधून मुख्यमंत्र्यांचा कोस्टल रोड दौरा


मुंबई - एखाद्या सामान्य नागरिकाने चुकीचे वाहन क्रमांक लावून वाहन चलवल्यास त्याच्यावर कारवाई केली जाते. मात्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ. शिंदे, उपमुख्यमंत्री व गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चुकीच्या नोंदणी क्रमांकाच्या व्हिंटेज कारमधून मुख्यमंत्र्यांचा कोस्टल रोडची पाहणी केल्याचा प्रकार उघड झाला आहे. यामुळे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना वेगळा कायदा आहे का अशी चर्चा रंगली आहे. 

कोस्टल रोडवरील दुसऱ्या मार्गिकेचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सोमवारी संपन्न झाले. या उद्घाटनप्रसंगी 1930 च्या व्हिंटेज रोल्स-रॉयसमधून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी प्रवास केला होता. रेमंड ग्रुपचे अध्यक्ष गौतम सिंघानिया यांनी ही कार उपलब्ध करून दिली होती. या कारचा क्रमांक MH O4 JU 4733 असा लिहिण्यात आला होता. 

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या ऑनलाइन `वाहन' डेटाबेसनुसार, MH O4 JU 4733 हा आयशर ट्रकचा क्रमांक आहे. जो ठाणे येथील एका रहिवाशाच्या नावावर नोंदणीकृत आहे. रोल्स रॉयसचा नोंदणी क्रमांक MH O4 JV 4733 असा आहे. नंबर प्लेट बनणाऱ्या व्यक्तीच्या चुकीमुळे हा घोळ झाला असावा अशी शक्यता वर्तवली जात आहे. (CM's coastal road tour in vintage car with wrong registration number)

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad