कोल्हापूर - कोल्हापूर शहरातील एका भीषण अपघाताच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शहरातील सायबर चौकात हा अपघात घडला. या अपघातात कारने चौघांना चिरडल्याची माहिती मिळाली आहे. यात चालकासह 3 ठार झाले असून 5 जखमी झाले आहेत. तर 3 दुचाकी आणि एका कारचं मोठं नुकसान झाल्याचं समोर आलंय. (Car Crashes Into Multiple Bikes) (Kolhapur Accident)
शहरातील सायबर चौकात दुपारच्या सुमारास काही लोक दुचाकीवरुन रस्ता ओलांडत होत्या. यावेळी सर्व वाहनांचा वेग कमी होता. प्रत्येकजण जागा मिळेल तशी वाहने पुढे नते होते. इतक्यात एका भरधाव वेगाने आलेल्या कारने दोन ते तीन दुचाकींना जोराची धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील लोक काही फूट फेकले गेले. जोराची धडक बसल्याने काही लोक गंभीर जखमी झाले आहेत. सुदैवाने यात एक चिमुरडी वाचल्याचे पाहायला मिळाले. अपघातानंतर स्थानिकांनी जखमींना रुग्णालयात दाखल करण्यास मदत केली. मात्र, तिघांना मृत घोषित केलं आहे. राजारामपुरी पोलीस आणि शहर वाहतूक शाखेचे पोलीस वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रयत्न करत होते. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाल्याने मोठा गोंधळ उडाला होता.
वसंत चव्हाण (वय 72) असं मृत्यू झालेल्या कारचालकाचे नाव आहे. त्यांचं गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला आहे. चव्हाण यांना काही आजार होता का? याची चौकशी त्यांच्या कुटुंबीयांकडून आता पोलीस करत आहेत. मयत कार चालक वसंत चव्हाण हे शिवाजी विद्यापीठाचे निवृत्त प्रभारी कुलगुरू होते. शिवाजी विद्यापीठाचे माजी प्र कुलगुरू व्ही एम चव्हाण यांचा देखील या अपघातात मृत्यू झाला. व्ही एम चव्हाण तब्येत बरी नसतानाही कार चालवत असल्याची माहिती समोर आली आहे.
कोल्हापूरच्या अपघातात जखमी आणि मयत व्यक्तींना अपघातानंतर साधी रुग्णवाहिका ही मिळाली नाही. त्यामुळे मिळेल त्या गाडीत मृत्युदेह आणि जखमींना ठेवण्याची वेळ पोलिसांवर आणि नागरिकांवर आली. मृत्यूनंतरही अवहेलना झाल्याचा प्रकार यामुळे पुढे आला आहे. या धक्कादायक प्रकारामुळे सगळे संताप व्यक्त करत आहेत.
No comments:
Post a Comment