रस्त्यावर खड्डा दिसल्यास 'येथे' तक्रार करा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

08 June 2024

रस्त्यावर खड्डा दिसल्यास 'येथे' तक्रार करा



मुंबई - मुंबईमध्ये दरवर्षी पावसाळ्यात रस्त्यावर खड्डे (pothole on the road) पडतात. रस्त्यावर खड्डे पडल्याने पालिकेवर सातत्याने टीका होते. याची गंभीर दखल घेत दरवर्षी प्रमाणे यंदाही पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पुढील दोन दिवसांत म्हणजे १० जूनपर्यंत रस्त्यांवरील खड्डे बुजवत वाहतुकीसाठी रस्ते खुले करा, असे निर्देश पालिका अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी दिले आहेत. खड्डे (pothole on the road) दिसल्यास पालिकेच्या हेल्पलाइनवर संपर्क साधण्याचे आवाहन करताना, खड्डे बुजवण्याकडे दुर्लक्ष केल्यास कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई करण्याचा ईशारा बांगर यांनी दिला आहे.

मुंबईत सुरू असलेली रस्त्याची कामे १० जूनपर्यंत ‘सेफ स्टेज’मध्ये आणून रस्ते वाहतूक योग्य करण्याचे आदेश पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी यापूर्वीच दिले आहे. यानुसार अतिरिक्त आयुक्त भूषण बांगर यांनी शुक्रवारी पुन्हा संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन रस्त्याची कामे आणि खड्ड्यांबाबत आढावा घेतला. एखाद्या ठिकाणी खड्डे आढळल्यास ते भरण्याची कार्यवाही लवकरात लवकर करता यावी, यादृष्टीने तक्रार नोंदणीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

खड्डा दिसला, तर येथे तक्रार करा !
पालिकेच्या अखत्यारितील खड्डेविषयक तक्रार करावयाची असल्यास ती ‘१९१६’ या क्रमांकावर करता येईल. हा क्रमांक २४ तास अव्याहतपणे कार्यरत असतो. मुंबई महानगरपालिकेच्या माय बीएमसी या ‘एक्स’ (पूर्वीचे ट्वीटर) अकाऊंटला टॅग करून देखील नागरिक खड्डेविषयक तक्रार नोंदवू शकतात. कोणत्याही खड्ड्याची तक्रार आल्यानंतर २४ तासांत खड्डा बुजवण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्तांनी संबंधितांना दिले आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad