कंगनाला राष्ट्रपती भवनात ठेवायला हवं - संजय राऊत - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

25 June 2024

कंगनाला राष्ट्रपती भवनात ठेवायला हवं - संजय राऊत



मुंबई - अभिनेत्री आणि नवनिर्वाचित भाजप खासदार कंगना रनौत पुन्हा एकदा वादात सापडली आहे. कंगनाने नुकतेच दिल्लीतील महाराष्ट्र सदनाला भेट दिली होती. यावेळी तिने महाराष्ट्र सदनातील मुख्यमंत्र्यांची खोली राहण्यासाठी मागितली, अशी माहिती समोर आली आहे. यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी कंगनाला चांगलच खडसावले असून, कंगना रनौत इतक्या मोठ्या आहेत की, त्यांना राष्ट्रपती भवानातच ठेवयाला हवं असा टोला राऊतांनी कंगनाला लगावला आहे. (Kangana should be kept in Rashtrapati Bhavan)

मिळालेल्या माहितीनुसार, नवीन खासदार जेव्हा दिल्लीत निवडून जातत, तेव्हा त्यांच्या कायम स्वरुपी निवासस्थान मिळेपर्यंत त्यांच्या राहण्याची व्यवस्था ते ज्या राज्यातून निवडून जातात, त्याच राज्याच्या सदनात केली जाते. मात्र कंगना रनौत हिमाचल प्रदेशमधील मंडी लोकसभा मतदारसंघातून निवडून आल्या असून, नियमानुसार त्यांनी दिल्लीतील हिमाचल प्रदेशच्या भवनात आपले बस्तान मांडले पाहिजे मात्र, खासदार कंगनानी महाराष्ट्र सदनात जाऊन मुख्यमंत्र्याची खोली मागितल्याने आर्श्चय व्यक्त केले जात असून, त्यांना टीकेला सामोरे जावे लागत आहे.

कंगनाची व्यवस्था हिमाचल भवनात झाली पाहिजे-संजय राऊत
दरम्यान, महाराष्ट्रातील अनेक जेष्ठ खासदार आहेत. जे जायंट किलर आहेत. मग त्यांनाही मुख्यमंत्र्यांच्या खोल्या द्याव्या का ? असा सवाल उपस्थित करून महाराष्ट्र सदनात जाऊन अशा मागण्या करणं हा मूर्खपणा आहे. कंगना या हिमाचलमधून आल्या आहेत. त्यांची व्यवस्था हिमाचल भवनात झाली पाहिजे. महाराष्ट्रातील खासदार सिंगल रूम मध्ये राहतात. कंगना यांना स्पेशल सुविधा मिळणार नाहीत. असं ही खासदार संजय राऊत म्हणाले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS