मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघ मतमोजणीसाठी सज्ज - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

03 June 2024

मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघ मतमोजणीसाठी सज्ज



मुंबई - लोकसभा सार्वत्रिक निव़डणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील 28 मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज असून, आज 4 जून रोजी मतमोजणी होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी उपेंद्र तामोरे यांनी दिली आहे. (Mumbai News) (Election News)

मुंबई उपनगर जिल्ह्यातील 28- मुंबई उत्तर पूर्व या मतदारसंघाची मतमोजणी उदयांचल शाळा, गोदरेज वसाहत, विक्रोळी पूर्व येथे होणार आहे. मतमोजणीसाठी एकुण सात सभागृह असून, ईव्हीएम मशीन मधील मतमोजणीसाठी सहा आणि टपाली मतमोजणीसाठी एक सभागृह आहे. सहा सभागृहात प्रत्येकी 14 टेबल असणार आहेत. प्रत्येकी एक मतमोजणी पर्यवेक्षक, एक मतमोजणी सहायक, एक सूक्ष्म निरीक्षक, एक मदतनीस असे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले आहे.

टपाली मतमोजणी सभगृहात एक मतमोजणी पर्यवेक्षक, दोन मतमोजणी सहायक, एक सूक्ष्म निरीक्षक, एक मदतनीस असे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले आहे. असे एकूण 99 टेबल असणार आहेत. तर मतमोजणीचे 22 राऊंड होणार आहेत. साधारण अधिकारी आणि कर्मचारी असे अंदाजे मतमोजणीसाठी 800 मनुष्यबळ कार्यरत असून, पोलिस विभागाचे कर्मचारी, अधिकारी मतमोजणीसाठी 500 ते 600 इतके मनुष्यबळ असणार आहे.

मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर मतमोजणीच्या ठिकाणी पुरेसा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. तसेच मतमोजणी केंद्र आणि परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. मतमोजणी केंद्रात कोणत्याही प्रकारचे इलेक्ट्रॅानिक डिव्हाईस गॅझेटस तसेच मोबाईल नेण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. मतमोजणी केंद्रात ओळखपत्राशिवाय कोणालाही प्रवेश दिला जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मतमोजणी केंद्रात येताना उमेदवार, उमेदवार प्रतिनिधी यांनी त्यांना दिलेले ओळखपत्र सोबत बाळगावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी उपेंद्र तामोरे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad