Mumbai News - अटल सेतूवर ६ महिन्यांतच तडे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

21 June 2024

Mumbai News - अटल सेतूवर ६ महिन्यांतच तडेनवी मुंबई - नवी मुंबईतील अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा सेवा अटल सेतूला तडे गेले. महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी घटनास्थळी भेट देऊन सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप केला आणि प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला.

महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी मुंबई-ट्रान्स हार्बर लिंक अटल सेतूवर पडलेल्या भेगांची पाहणी केली. निवडणुकीपूर्वी या पुलाचे उद्घाटन करण्यात आले. "संपूर्ण राज्यात भ्रष्टाचार आहे, आम्ही विधानसभेत भ्रष्टाचाराची अनेक उदाहरणे मांडू, आम्ही जे बोलतोय ते केवळ आरोप नाही, हे दाखवण्यासाठी मी आलो आहे. असे नाना पटोले यावेळी म्हणाले.

सरकार लोकांसाठी काम करत असल्याचे दाखवत आहे, पण इथे भ्रष्टाचार दिसतो. ते आपले खिसे भरत आहेत, पण जनतेचा जीव धोक्यात घालण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला? "या भ्रष्ट सरकारला कसे हटवायचे याचे नियोजन लोकांनी केले पाहिजे असे यावेळी पटोले म्हणाले.

२१.८ किमी लांबीचा आणि ६ लेनचा पूल -
हा पूल 21.8 किमी लांबीचा आणि 6 लेनचा आहे. हा सेतू समुद्रावर 16.5 किमी लांबीचा आणि जमिनीवर सुमारे 5.5 किमी लांबीचा आहे. हा देशातील सर्वात लांब पूल आहे. या सेतूमुळे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांना कनेक्टिव्हिटी प्रदान झाली आहे. यामुळे मुंबई ते पुणे, गोवा आणि दक्षिण भारतात जाण्यासाठी लागणारा वेळही कमी झाला आहे. मुंबई बंदर आणि जवाहरलाल नेहरू बंदर यांच्यातील कनेक्टिव्हिटीसाठी हा सेतू अधिक चांगला आहे.

17,840 कोटी रुपये बांधकाम खर्च -
अटल सेतुच्या बांधकामाला अंदाजे 17,840 कोटी रुपये खर्च आला आहे. MTHL हा भारतातील सर्वात लांब पूल आणि देशातील सर्वात लांब सागरी पूल आहे. नवी मुंबईतील उलवेच्या दिशेने बाहेर पडताना सेतूवर तडे गेले. डांबरी रस्त्याच्या एका बाजूला या भेगा पडल्या आहेत. यावर्षी 12 जानेवारीला सेतूचे उद्घाटन झाले होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad