धक्कादायक... आईस्क्रीममध्ये आढळला माणसाच्या बोटाचा तुकडा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

13 June 2024

धक्कादायक... आईस्क्रीममध्ये आढळला माणसाच्या बोटाचा तुकडामुंबई - आईस्क्रीम सर्वांनाच आवडते. मात्र हेच आवडते आईस्क्रीम कोणतीही काळजी न घेता बनवले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. मुंबईच्या मालाड येथे ऑनलाईन ऑर्डर केलेल्या आइस्क्रीममध्ये चक्क माणसाचे बोट सापडल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलीसांकडे तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास सुरु करण्यात आला आहे. (human finger inside cone ice cream) (Mumbai News)

मिळालेल्या माहितीनुसार, मालाड येथे राहणाऱ्या ओर्लेम ब्रेण्डन सेराव (२७) यांनी झेप्टोद्वारे ऑनलाईन पद्धतीने आइस्क्रीम कोन मागवला होता. आइस्क्रीम घरी येताच ओर्लेमने ते उघडून खाण्यास सुरुवात केली, पण आईस्क्रीमचा आनंद घेताना त्यांच्या जिभेला काहीतरी टोचले, त्यामुळे आइस्क्रीममध्ये नक्की काय आहे हे पाहण्यासाठी त्यांनी ते बाहेर खेचले आणि त्यांना धक्काच बसला. आइस्क्रीममध्ये त्यांना दोन सेमी लांबीचा मानवी बोटाचा तुकडा आढळला. यामुळे ओर्लेम यांना आश्चर्याचा धक्का बसला.

आईस्क्रीममध्ये माणसाच्या हाताचे बोट आढळून आल्याने ओर्लेम यांनी मालाड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. हे बोट कोणत्या माणसाचे असावे याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी सुरुवात केली आहे. बोटाचा तुकडा न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविण्यात आला आहे. जेथे आइस्क्रीम तयार केले जाते तसेच जेथे त्याचे पॅकिंग केले जाते त्या जागांची तपासणी पोलिसांकडून करण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad