Mumbai News अटल सेतूवर कोणतेही तडे नाहीत - एमएमआरडीए - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

21 June 2024

Mumbai News अटल सेतूवर कोणतेही तडे नाहीत - एमएमआरडीए


मुंबई - अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा अटल सेतूच्या (Atal Setu) मुख्य भागावर कोणतेही तडे गेले नसून अटल सेतूला जोडणाऱ्या पोहोच मार्गावर किरकोळ भेगा आढळून आल्या आहेत. हा पोहाच मार्ग मुख्य पुलाचा भाग नसून तो पुलाला जोडणारा सेवा रस्ता आहे. तसेच उत्पन्न झालेल्या भेगा या प्रकल्पातील संरचनात्मक दोषांमुळे नाहीत. त्यामुळे पुलाच्या संरचनेला कोणताही धोका नसल्याचे लक्षात घेणे अत्यंत महत्त्वाचे आहेअसे स्पष्टीकरण मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (एमएमआरडीए) देण्यात आले आहे. (Mumbai News) 

प्रकल्पाच्या ऑपरेशन आणि मेंटेनन्स टीमने 20 जून 2024 रोजी केलेल्या तपासणीदरम्यानउलवेकडून मुंबईच्या दिशेला जाणाऱ्या रॅम्प क्रमांक 5 अस्फाल्टवर तीन ठिकाणी किरकोळ भेगा निदर्शनास आल्या आहेत. या भेगा त्वरीत दुरूस्त करण्यासारख्या आहेत. अटल सेतू प्रकल्पाच्या पॅकेज 4 चा कंत्राटदारमेसर्स स्ट्रॅबॅग या कंपनीने सदर भागातील दुरुस्तीचे काम सुरू केले असून सेतूवरील वाहतुकीला कोणताही अडथळा न होऊ देता 24 तासांत हे काम पूर्ण केले जाणार असल्याचेही एमएमआरडीएमार्फत कळविण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS