VIP सुरक्षा रचनेत मोठे बदल - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

VIP सुरक्षा रचनेत मोठे बदल

Share This


नवी दिल्ली - नवे केंद्रीय मंत्री पदभार स्वीकारत असतानाच केंद्र सरकारने अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी असलेल्या सुरक्षा रचनेत मोठे बदल करण्याचे ठरविले आहे. त्याचप्रमाणे जीवाला अतिधोका असलेल्या व्यक्तींना एनएसजी आणि आयटीबीपीकडून देण्यात येणारी सुरक्षाही काढून घेण्यात येणार असून ही कामगिरी अन्य निमलष्करी दलांकडे सोपिवण्यात येणार आहे, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले.

केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अखत्यारित असलेल्या या सुरक्षा व्यवस्थेत लवकरच बदल करण्यात येणार असून विविध राजकीय पक्षांचे नेते, माजी मंत्री, सेवानिवृत्त नोकरशहा आणि अन्य यांना उपलब्ध करून देण्यात आलेली सुरक्षा व्यवस्था काढून घेण्यात येणार आहे वा कमी करण्यात येणार आहे अथवा वाढविण्यात येणार आहे, असे सूत्रांनी म्हटले आहे.

व्हीआयपी सुरक्षेतून एनएसजीच्या ‘ब्लॅक कॅट’ कमांडोंची व्यवस्था पूर्णपणे मागे घेण्याच्या बहुप्रतीक्षित प्रस्तावाची अंमलबजावणी आता केली जाणार असून नऊ झेड-प्लस वर्गवारीतील सुरक्षा व्यवस्था केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) व्हीआयपी सुरक्षेकडे सोपिवण्यात येणार आहे, असेही सूत्रांनी सांगितले.

त्याचप्रमाणे काही जणांना भारत-तिबेट सीमा पोलीस (आयटीबीपी) संरक्षण देण्यात आले आहे, ती सुरक्षा व्यवस्था सीआरपीएफ अथवा सीआयएसएफच्या सुरक्षा दलाकडे वर्ग करण्यात येणार असून त्याला विशेष सुरक्षा गट म्हणून ओळखले जाणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages