Konkan Railway - कोकण रेल्वेवरील "या" गाड्या पनवेल येथून सुटणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

Konkan Railway - कोकण रेल्वेवरील "या" गाड्या पनवेल येथून सुटणार

Share This

मुंबई - मध्य रेल्वेच्या लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) येथे यार्डमधील रेल्वेगाड्यांची देखभाल आणि दुरुस्ती करणाऱ्या पिट लाइनचे काम करण्यात येणार आहे. यासाठी १ ते ३० जुलैपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गे धावणारी नेत्रावती आणि मत्स्यगंधा एक्स्प्रेस एलटीटीऐवजी पनवेलपर्यंत धावेल आणि पनवेलवरूनच  सुटणार आहे. (This trains on Konkan Railway will depart from Panvel)

मध्य रेल्वेवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि ठाणे येथे मेगाब्लॉक घेण्यात आला होता. या मेगाब्लॉक दरम्यान आणि नंतर रेल्वे गाड्या उशिरा धावत असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. त्यातच कोकण रेल्वेच्या गाड्या सुमारे १० तास उशिराने धावत असल्याने प्रवाशांच्या वेळेचा अपव्यय होत आहे. यामुळे मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वेवरील प्रवासी संतप्त आहेत. 

आता लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) येथे पायाभूत कामासाठी १ ते ३० जुलैपर्यंत ब्लॉक घेण्यात आला आहे.  त्यामुळे ३० जूनपासून पुढील एक महिना मध्य आणि कोकण रेल्वे मार्गे धावणारी नेत्रावती आणि मत्स्यगंधा एक्स्प्रेस एलटीटीऐवजी पनवेलपर्यंत धावणार आहे तसेच या गाड्या पनवेलवरूनच सुटणार आहेत. 

असा करण्यात आला आहे बदल - 
गाडी क्रमांक १६३४६ तिरुअनंतपुरम ते लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान दैनंदिन नेत्रावती एक्स्प्रेस ३० जून ते ३० जुलै या कालावधीत निर्धारित लोकमान्य टिळक टर्मिनस ऐवजी पनवेल स्थानकातच आपला प्रवास संपवणार आहे. तसेच गाडी क्रमांक १६३४५ लोकमान्य टिळक टर्मिनस ते तिरुअनंतपुरम दरम्यान धावणारी दैनंदिन नेत्रावती एक्सप्रेस १ ते ३० जुलै अशी संपूर्ण महिनाभर पनवेल येथूनच आपल्या प्रवास सुरू करणार आहे. गाडी क्रमांक १२६२० मंगळूर सेंट्रल ते लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान धावणारी मत्स्यगंधा एक्सप्रेस ३० जून ते ३० जुलै या कालावधीत पनवेलपर्यंतच धावणार आहे. तसेच गाडी क्रमांक १२६१९ लोकमान्य टिळक टर्मिनस ते मंगळूर सेंट्रल मत्स्यगंधा एक्स्प्रेस १ ते ३० जुलै या कालावधीत पनवेल येथूनच मंगळूर सेंट्रलला जाण्यासाठी निघणार आहे. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages