मुंबई - अजित पवारांच्या पिंपरी येथील मेळाव्यात काही कार्यकर्त्यांनी अजित पवारांना घड्याळ भेट दिले. त्यावेळी, कार्यकर्त्यांनी भेट दिलेल्या घड्याळात १२ वाजण्यासाठी केवळ १० मिनिटांचा अवधी असल्याचं छायाचित्रा दिसून येत आहे. त्यावरुन, आता शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने अजित पवारांवर निशाणा साधला आहे.
स्वत: कमावलेल्या आणि हिसकावून घेतलेल्या गोष्टीत फार फरक असतो. त्यामुळेच तुम्ही हिसकावून घेतलेले चिन्हे सुद्धा तुमचे १२ वाजायला १० मिनिटे शिल्लक आहे हेच दाखवत आहे असे ट्विट एनसीपीच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन करण्यात आले आहे. त्यामुळे, या फोटोवरुनही अजित पवारांना लक्ष्य करण्याची संधी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाते नेते आणि पदाधिकारी साधत असल्याचे दिसून येते. स्वत: कमावलेल्या आणि हिसकावून घेतलेल्या गोष्टीत फार फरक असतो.
No comments:
Post a Comment