भाजप आणि काँग्रेस दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

21 July 2024

भाजप आणि काँग्रेस दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू


मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारने सामाजिक न्याय विभागाकडून अनुसूचित जाती आणि जमातींच्या कल्याणासाठी असलेला निधी इतरत्र वळवला आहे. भाजप आणि काँग्रेस हे दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू असून, ते दलित आणि आदिवासी बांधवांच्या विरोधी असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

ॲड. आंबेडकर म्हणाले की, कर्नाटकातील काँग्रेसने गेल्या 2 वर्षांपासून एससी आणि एसटी फंडातून 14 हजार कोटी रुपये इतरत्र वळवले आहेत. काँग्रेसने या वर्षापासून एससी आणि एसटीच्या विद्यार्थ्यांना परदेशी विद्यापीठांमध्ये पीएचडीसाठी दिलेली आर्थिक मदतही रद्द केली आहे. भाजप आणि काँग्रेसमध्ये काही फरक दिसतो का? ते दोघेही सारखेच आहेत. काँग्रेस आणि भाजप दोन्ही दलित आणि आदिवासीविरोधी असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS