
मुंबई - लपाछपी खेळताना दोरीचा फास लागल्यामुळे एका 7 वर्षीय मुलीचा तडफडून मृत्यू झाल्याची दुःखद घटना गोवंडीच्या बैगनवाडी शिवाजीनगर भागात घडली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, बैगनवाडी येथे ही घटना घडली. आकृती सिंह असे मृत मुलीचे नाव आहे. आकृती रविवारी दुपारी आपली भावंडे व शेजारच्या एका मुलीसोबत लपाछपी खेळत होती. आकृती पोटमाळ्यावर लपली होती. तेथून खाली उतरताना शिडीच्या दोरीचा फास तिच्या गळ्यात अडकला. त्यामुळे तिला फास लागला. ही बाब लक्षात येताच तिच्या मोठ्या बहिणीने तत्काळ घराबाहेर जात शेजाऱ्यांना त्याची माहिती दिली. त्यानंतर शेजाऱ्यांनी घरात धाव घेऊन तिला लगतच्या एका रुग्णालयात दाखल केले. पण उपचारापूर्वीच आकृतीचा मृत्यू झाला. घटनेवेळी तिचे कुटुंबीय बाहेर गेले होते. शिवाजी नगर पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा