बनावट औषध विक्री करणाऱ्यांवर कारवाई - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

13 July 2024

बनावट औषध विक्री करणाऱ्यांवर कारवाई


मुंबई - अन्न व औषध प्रशासनाकडून बनावट औषध विक्री करणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्यात येत आहे. तसेच विभागाच्या ड्रग्ज निरीक्षकांकडून याबाबत नियमितपणे तपासणी करण्यात येत आहे. त्याचा मासिक आढावा घेतला जात असल्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी विधानपरिषदेत सांगितले.

अन्न व औषध प्रशासनाकडून कोट्यवधी रुपयांची बनावट औषधे जप्त करण्यात आल्याबाबत सदस्य भाई गिरकर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर मंत्री आत्राम बोलत होते.

मे. हेट्रो हेल्थकेअर लि. हैद्राराबाद, तेलंगणा या उत्पादकाचा इंजेक्शन, समूह क्र. CIZUMAB 400 (BB2311A) या औषधाचा बनावट असलेल्या साठ्याची विक्री बाजारात होत असल्याची गोपनीय माहिती जानेवारी, २०२४ मध्ये प्राप्त झाली होती. त्यानुषंगाने, बनावट औषधांचा अन्न व औषध प्रशासनाद्वारे शोध घेण्यात आला. या तपासात औषधांच्या ३ व्हायल्स मे. लाईफक्युरा फार्मा, चेंबूर पूर्व, मुंबई यांच्याकडून प्राप्त झाल्या असून त्यापैकी २ व्हायल्स अनौपचारिकरित्या चाचणीसाठी शासकीय विश्लेषक, औषध नियंत्रण प्रयोगशाळा, मुंबई यांच्याकडे पाठविण्यात आल्या आहेत. तसेच, १ व्हायलची तुलना उत्पादक यांच्या उत्पादनावेळी ठेवण्यात आलेल्या Control Sample सोबत केली असता मे. लाईफक्युरा फार्मा, चेंबूर पूर्व, मुंबई यांच्याकडील उपलब्ध औषध बनावट असल्याचे आढळून आले आहे. या प्रकरणी संबंधितांविरुद्ध औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा, १९४० या अंतर्गत गोवंडी पोलीस स्टेशन, गोवंडी, मुंबई येथे प्रथम खबर अहवाल (FIR) क्र.००६८, दि. १२ मार्च २०२४ रोजी दाखल करण्यात आला आहे. बनावट औषध खरेदी विक्री करणाऱ्या मे. के डेक्कन हेल्थकेअर वाडिया कॉलेज जवळ, पुणे या पेढीचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. तसेच, इतर संबंधित औषध विक्रेत्यांसंदर्भात कार्यवाही सुरू आहे.

या प्रकरणी पोलिसांसोबत पुढील तपास सुरू आहे. तपासणीअंती संबंधितांविरुद्ध औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा, १९४० अंतर्गत न्यायालयात खटला दाखल करण्यात येईल, असे मंत्री आत्राम यांनी सांगितले. या प्रश्नाच्या चर्चैत सदस्य शशिकांत शिंदे यांच्यासह अन्य सदस्यांनी सहभाग घेतला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad